S M L

उस्मानाबादजवळ बस पुलावरून कोसळून 32 ठार

16 जूनउस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्गजवळ खासगी बस पुलावरून कोसळून 32 जणांचा मृत्यू आणि 15 जण जखमी झालेत. त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. बसमधले सर्व प्रवासी हैदराबादचे आहेत. हैदराबादहून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत होते. काल रात्री अडीच वाजता हा भीषण अपघात झाला. दरम्यान, बसचा ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. के. यादवगिरी असं या ड्रायव्हरचं नाव आहे. प्रवासादरम्यान जहिराबाद परिसरातल्या एका ढाब्यावर ड्रायव्हरला दारू पिताना पाहिल्याचं प्रवाशांनी सांगितलंय. पण, दोन ड्रायव्हर असल्यानं नेमका कोणता ड्रायव्हर बस चालवतोय, हे न समजल्यामुळे तक्रार केली नसल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2012 03:26 PM IST

उस्मानाबादजवळ बस पुलावरून कोसळून 32 ठार

16 जून

उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्गजवळ खासगी बस पुलावरून कोसळून 32 जणांचा मृत्यू आणि 15 जण जखमी झालेत. त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. बसमधले सर्व प्रवासी हैदराबादचे आहेत. हैदराबादहून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत होते. काल रात्री अडीच वाजता हा भीषण अपघात झाला. दरम्यान, बसचा ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. के. यादवगिरी असं या ड्रायव्हरचं नाव आहे. प्रवासादरम्यान जहिराबाद परिसरातल्या एका ढाब्यावर ड्रायव्हरला दारू पिताना पाहिल्याचं प्रवाशांनी सांगितलंय. पण, दोन ड्रायव्हर असल्यानं नेमका कोणता ड्रायव्हर बस चालवतोय, हे न समजल्यामुळे तक्रार केली नसल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2012 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close