S M L

गोदावरीकडे मनसे लक्ष देईल का ?

16 जूननाशिकची गोदावरी आणि तिच्या काठचा गोदापार्क हा खरं तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मात्र, नाशिकची सत्ता हाती येऊन 4 महिने झाले तरी गोदावरीच्या प्रदुषणावर मनसेला उत्तर सापडलेलं नाही. गोदापात्रात सोडलं जाणारं गटाराचं पाणी थांबवावं या मागणीसाठी नाशिकमधल्या संस्था-संघटनांचं आंदोलन सुरू आहे. पण ना आंदोलकांच्या घोषणा राज ठाकरेंपर्यंत पोहोचताहेत, ना गोदापात्रातली दुर्गंधी... एका खाजगी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे आज नाशिकमध्ये आले होते.विशेष म्हणजे राज ठाकरे शिवसेनेत असताना गोदीवरीच्या काठी गोदापार्क उभारले होते. यासाठी राज यांनी जातीने लक्ष घालून गोदापार्क उभारले. मात्र काही दिवसांनी गोदाच्या परिस्थितीमुळे पार्कची ही दुरावस्था झाली. यंदाच्या महापालिका निवडणुकीत मनसेनं सर्वाधिक 40 जागा घेऊन शहरात सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ सत्ता स्थापन करुन मनसेचा पहिला महापौर पालिकेच्या खुर्चीवर विराजमान झाला. महापौर यतिन वाघ यांनी महापौर होताच गोदावरीचा दौरा केला. पण दौराहून सुध्दा चार महिने झाली. अलीकडेच अनेक संस्था,विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पालिकेनं साफसफाईला सुरुवात केली असली तरी इतकी दुरावस्था होईपर्यंत पालिका झोपा काढत होती का असा सवाल येथील नागरीक विचारत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2012 11:21 AM IST

गोदावरीकडे मनसे लक्ष देईल का ?

16 जून

नाशिकची गोदावरी आणि तिच्या काठचा गोदापार्क हा खरं तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मात्र, नाशिकची सत्ता हाती येऊन 4 महिने झाले तरी गोदावरीच्या प्रदुषणावर मनसेला उत्तर सापडलेलं नाही. गोदापात्रात सोडलं जाणारं गटाराचं पाणी थांबवावं या मागणीसाठी नाशिकमधल्या संस्था-संघटनांचं आंदोलन सुरू आहे. पण ना आंदोलकांच्या घोषणा राज ठाकरेंपर्यंत पोहोचताहेत, ना गोदापात्रातली दुर्गंधी... एका खाजगी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे आज नाशिकमध्ये आले होते.

विशेष म्हणजे राज ठाकरे शिवसेनेत असताना गोदीवरीच्या काठी गोदापार्क उभारले होते. यासाठी राज यांनी जातीने लक्ष घालून गोदापार्क उभारले. मात्र काही दिवसांनी गोदाच्या परिस्थितीमुळे पार्कची ही दुरावस्था झाली. यंदाच्या महापालिका निवडणुकीत मनसेनं सर्वाधिक 40 जागा घेऊन शहरात सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ सत्ता स्थापन करुन मनसेचा पहिला महापौर पालिकेच्या खुर्चीवर विराजमान झाला. महापौर यतिन वाघ यांनी महापौर होताच गोदावरीचा दौरा केला. पण दौराहून सुध्दा चार महिने झाली. अलीकडेच अनेक संस्था,विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पालिकेनं साफसफाईला सुरुवात केली असली तरी इतकी दुरावस्था होईपर्यंत पालिका झोपा काढत होती का असा सवाल येथील नागरीक विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2012 11:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close