S M L

विजयी क्रिकेट टीमचा शिल्पकार गॅरी कर्स्टन

25 नोव्हेंबर भारतीय क्रिक्रेट टीमची कामगिरी जबरदस्त होत आहे. आणि त्यामुळेच कॅप्टन महेंद्रसिंग धोणी सध्या सगळीकडे हेडलाइन्समध्ये आहे. पण त्याचबरोबर आणखी एका व्यक्तीचा भारताच्या विजयात मोठा वाटा आहे. आणि ते म्हणजे भारताचे कोच गॅरी कर्स्टन. दक्षिण आफ्रिकेसाठी 101 टेस्ट मॅच खेळलेले कर्स्टन हेही एक यशस्वी कोच म्हणून आता समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा 43वा वाढदिवस होता. पण गॅरी कर्स्टन आपल्या नेहमीप्रमाणे शांत दिसत होते. या वाढदिवसाला इंग्लंडविरुध्दची वन डे सीरिज 4-0नं जिंकत भारतीय टीमनं त्यांना एक अनोखी भेट दिली. भारताच्या या विजयी कामगिरीत कर्स्टन यांचा मोलाचा वाटा आहे. टीमच्या प्रगतीबाबत गॅरी कर्स्टन सांगतात, भारतीय टीमची कामगिरी खूप चांगली होत आहे. कारण ते वैयक्तिक खेळत नाहीत तर ते एक टीम म्हणून खेळत आहेत. सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणा-या वीरेंद्र सेहवागचही त्यांनी कौतुक केलं.कर्स्टन यांच्या कोचिंगवर भारतीय खेळाडूही खूष आहेत. टीम इंडियामध्ये सध्या तरुण खेळाडूंचा भरणा आहे. कोच म्हणून कर्स्टन यांच्यासमोर आव्हान आहे ते या खेळाडूंना घडवण्याचं. बीसीसीआय बरोबर कर्स्टन यांचा तीन वर्षांचा करार आहे. त्यांनी टीमला जिंकायची सवय तर नक्कीच लावली आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला आणखी बरेच माईलस्टोनही गाठायचे आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2008 04:50 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2008 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close