S M L

टोल नाक्यावर मनसे सैनिकांचा 'पहारा' - राज

15 जूनप्रत्येक टोल नाक्यावर मनसेचे 50 कार्यकर्ते सोमवारपासून 15 दिवस शांतपणे पहारा देतील किती गाड्या गेल्यात, किती टोल वसूल करण्यात आला याचा हिशेब ठेवतील. याकाळात कार्यकर्त्यांकडून कोणतीच ऍक्शन दिसणार नाही पण जर टोल नाक्याच्या कर्मचार्‍यांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला. तसेच छगन भुजबळ यांनी मला शिकवण्याच्या भानगडीत पडू नये मला व्यवसाय काय असतो ते माहित आहे असा टोलाही राज यांनी लगावला. राज ठाकरे यांनी टोल नाक्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनच्या दुसर्‍या भागाचा अंक उघडला. आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेऊन टोल नाक्यांचा समाचार घेतला. गेल्या दोन-तीन दिवसात कार्यकर्त्यांकडून टोल नाक्यांची तोडफोड झाली ती साहजिकच होती. त्याला इलाज नव्हता मुळात जे रस्ते बांधण्यात आले आहेत, उड्डाणपूल बांधण्यात आले आहे त्यांचा खर्च वसूल करण्यासाठी टोल नाके सुरु करण्यात आले. पण रस्त्याचा पैसा वसूल होऊन सुध्दा टोल नाके सुरु असतील याचा पर्दाफाश झालाच पाहिजे हे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे पाऊलं उचलणे गरजेचे होते. यासाठी पुढील 15 दिवस प्रत्येक टोल नाक्यावर मनसेचे 50 कार्यकर्ते शांतपणे पहारा देतील. यावेळी किती वाहनं गेली,किती टोल वसुल केला याचा हिशेब ठेवतील जर टोल नाक्याच्या कर्मचार्‍यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर अख्खा महाराष्ट्रात जो हंगामा करेन तो यांना आवरता येणार नाही. आम्हाला आमचे काम करु द्यावे असा इशारा राज यांनी दिला. तसेच भुजबळ यांनी मला शिकवण्याच्या भानगडीत पडू नये मला व्यवसाय काय आहे हे माहित आहे. भुजबळ असे चिडले जणू त्यांच्या रोजी रोटीवर मी पाय दिला असा टोलाही राज यांनी लगावला. तसेच सरकारला जागतिक बँकांकडे कर्ज मागायला जात नाही कारण त्याचे नियम कडक असतात म्हणून हे खासगी धोरण राबवतात आणि सर्वसामान्याची लूट करतात. मुळात टोल नाक्यांचा कारभार हा पारदर्शक नाहीच 'हम करे सो कायदा' असाच सरकारचा कारभार आहे. नेहमी टेंडर भरली जातात आकडे कमी दाखवतात आणि जनतेची लूट करतात हे सगळे नेहमीचेच झालं आहे. या सगळ्या प्रकारला कंत्राटदार आणि पीडब्यूडी जबाबदार आहे. त्यांनी आपला अहवाल सरकारला सादर करायला हवा, पण खरं कधी दाखवलंच जात नाही. राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार ज्या रस्त्यावर टोल नाका उभारला आहे त्या रस्त्यावर वृक्षारोपण करणे, ऍम्ब्यूलन्स सेवा, अग्निशमन गाड्या, स्त्री-पुरुषांसाठी शौचालय आदी सेवा द्यावा लागतात पण आपल्याकडे कुठे आहेत हे सगळं ? असा सवाल राज यांनी पुराव्यांनिशी उपस्थिती केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2012 05:35 PM IST

टोल नाक्यावर मनसे सैनिकांचा 'पहारा' - राज

15 जून

प्रत्येक टोल नाक्यावर मनसेचे 50 कार्यकर्ते सोमवारपासून 15 दिवस शांतपणे पहारा देतील किती गाड्या गेल्यात, किती टोल वसूल करण्यात आला याचा हिशेब ठेवतील. याकाळात कार्यकर्त्यांकडून कोणतीच ऍक्शन दिसणार नाही पण जर टोल नाक्याच्या कर्मचार्‍यांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला. तसेच छगन भुजबळ यांनी मला शिकवण्याच्या भानगडीत पडू नये मला व्यवसाय काय असतो ते माहित आहे असा टोलाही राज यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी टोल नाक्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनच्या दुसर्‍या भागाचा अंक उघडला. आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेऊन टोल नाक्यांचा समाचार घेतला. गेल्या दोन-तीन दिवसात कार्यकर्त्यांकडून टोल नाक्यांची तोडफोड झाली ती साहजिकच होती. त्याला इलाज नव्हता मुळात जे रस्ते बांधण्यात आले आहेत, उड्डाणपूल बांधण्यात आले आहे त्यांचा खर्च वसूल करण्यासाठी टोल नाके सुरु करण्यात आले. पण रस्त्याचा पैसा वसूल होऊन सुध्दा टोल नाके सुरु असतील याचा पर्दाफाश झालाच पाहिजे हे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे पाऊलं उचलणे गरजेचे होते.

यासाठी पुढील 15 दिवस प्रत्येक टोल नाक्यावर मनसेचे 50 कार्यकर्ते शांतपणे पहारा देतील. यावेळी किती वाहनं गेली,किती टोल वसुल केला याचा हिशेब ठेवतील जर टोल नाक्याच्या कर्मचार्‍यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर अख्खा महाराष्ट्रात जो हंगामा करेन तो यांना आवरता येणार नाही. आम्हाला आमचे काम करु द्यावे असा इशारा राज यांनी दिला. तसेच भुजबळ यांनी मला शिकवण्याच्या भानगडीत पडू नये मला व्यवसाय काय आहे हे माहित आहे. भुजबळ असे चिडले जणू त्यांच्या रोजी रोटीवर मी पाय दिला असा टोलाही राज यांनी लगावला.

तसेच सरकारला जागतिक बँकांकडे कर्ज मागायला जात नाही कारण त्याचे नियम कडक असतात म्हणून हे खासगी धोरण राबवतात आणि सर्वसामान्याची लूट करतात. मुळात टोल नाक्यांचा कारभार हा पारदर्शक नाहीच 'हम करे सो कायदा' असाच सरकारचा कारभार आहे. नेहमी टेंडर भरली जातात आकडे कमी दाखवतात आणि जनतेची लूट करतात हे सगळे नेहमीचेच झालं आहे. या सगळ्या प्रकारला कंत्राटदार आणि पीडब्यूडी जबाबदार आहे. त्यांनी आपला अहवाल सरकारला सादर करायला हवा, पण खरं कधी दाखवलंच जात नाही. राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार ज्या रस्त्यावर टोल नाका उभारला आहे त्या रस्त्यावर वृक्षारोपण करणे, ऍम्ब्यूलन्स सेवा, अग्निशमन गाड्या, स्त्री-पुरुषांसाठी शौचालय आदी सेवा द्यावा लागतात पण आपल्याकडे कुठे आहेत हे सगळं ? असा सवाल राज यांनी पुराव्यांनिशी उपस्थिती केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2012 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close