S M L

दूध टँकरची टोल नाक्यांवर तपासणी

16 जूनगेल्या महिन्यापासून राज्यात दूध भेसळीचे प्रमाण वाढल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं कल रात्री मुंबईच्या सर्वच जकात नाक्यावर दूध तपासणी केली. वाशीच्या जकात नाक्यावर तर मिनी प्रयोगशाळाचं उभी केली. वाशी नाक्यावर दुधाच्या टँकरची तपासणी केली गेली मात्र भेसळीचा प्रकार आढळला नाही. मात्र यापुढेही ही तपासणी सुरुचं राहणार असल्याचं अन्न प्रशासन अधिकारी महेश झगडे यांनी म्हटलं आहे. या अगोदर खार पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन खात्याने संयुक्त कारवाई करत खारदांडा भागात 5 ते6 घरांवर छापा टाकला होता. या छाप्यात 400 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं होतं. तसेचे पाच जणांना अटक करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2012 08:19 AM IST

दूध टँकरची टोल नाक्यांवर तपासणी

16 जून

गेल्या महिन्यापासून राज्यात दूध भेसळीचे प्रमाण वाढल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं कल रात्री मुंबईच्या सर्वच जकात नाक्यावर दूध तपासणी केली. वाशीच्या जकात नाक्यावर तर मिनी प्रयोगशाळाचं उभी केली. वाशी नाक्यावर दुधाच्या टँकरची तपासणी केली गेली मात्र भेसळीचा प्रकार आढळला नाही. मात्र यापुढेही ही तपासणी सुरुचं राहणार असल्याचं अन्न प्रशासन अधिकारी महेश झगडे यांनी म्हटलं आहे. या अगोदर खार पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन खात्याने संयुक्त कारवाई करत खारदांडा भागात 5 ते6 घरांवर छापा टाकला होता. या छाप्यात 400 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं होतं. तसेचे पाच जणांना अटक करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2012 08:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close