S M L

सुसरी धरणाविरोधात वसई पालिकेवर मोर्चा

16 जूनडहाणूतलं सुसरी धरण रद्द करण्यासाठी वसई विरार शहर महानगर पालिकेवर आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो आदिवासी महिला सामिल झाल्या होत्या. डहाणू रानशेत गावाजवळ सुसरी धरण प्रस्तावित आहे. या धरणासाठी 774 हेक्टर खाजगी आणि 114 हेक्टर वनजमीन जाणार आहे. त्यामुळे तीन गावातील 13 पाडे म्हणजे 3 हजार 551 लोक विस्थापित होणार आहेत असा येथील कार्यकर्त्यांचा आरोप आहे. डहाणूतील जमीन दुस-यांना पाणी देण्यासाठी का द्यावी ज्यांना पाणी हवे आहे त्यांनी त्यांच्या जागेत धरण सिडकोनं सुचवलेल्या ठिकाणी बांधावं. वसईसाठी दूर धरण हे बिल्डरांच्या भल्यासाठी बांधत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2012 01:46 PM IST

सुसरी धरणाविरोधात वसई पालिकेवर मोर्चा

16 जून

डहाणूतलं सुसरी धरण रद्द करण्यासाठी वसई विरार शहर महानगर पालिकेवर आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो आदिवासी महिला सामिल झाल्या होत्या. डहाणू रानशेत गावाजवळ सुसरी धरण प्रस्तावित आहे. या धरणासाठी 774 हेक्टर खाजगी आणि 114 हेक्टर वनजमीन जाणार आहे. त्यामुळे तीन गावातील 13 पाडे म्हणजे 3 हजार 551 लोक विस्थापित होणार आहेत असा येथील कार्यकर्त्यांचा आरोप आहे. डहाणूतील जमीन दुस-यांना पाणी देण्यासाठी का द्यावी ज्यांना पाणी हवे आहे त्यांनी त्यांच्या जागेत धरण सिडकोनं सुचवलेल्या ठिकाणी बांधावं. वसईसाठी दूर धरण हे बिल्डरांच्या भल्यासाठी बांधत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2012 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close