S M L

आता नविन ठाणे शहर !

विनय म्हात्रे, ठाणे16 जूनमुंबई वरील भार कमी करण्यासाठी ज्या पध्दतीनं नवी मुंबई शहर वसवलं. त्याच पध्दतीनं ठाणे शहरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नविन ठाणे शहर तयार करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेनं नेमलेल्या कन्सल्टन्टने हा प्रस्ताव तयार केलाय. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी ही हिरवा कंदील दाखवला.सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेलं ठाणे शहर अक्राळ विक्राळ वाढू लागलंय. इथल्या लोकसंख्येत दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढ होतेय. त्यामुळे शहराचा काही भाग आता अभयारण्यात शिरू पाहतोय. ठाण्याच्या वाहतुकीचा ताणही कमालीचा वाढला आहे. यावरच उपाय म्हणून ठाणे खाडी ते भिवंडी बायपास यामधली सुमारे 100 चौरस किलो मिटर जागेत नवं शहर उभारण्याचा प्रस्ताव आहे.आता 'नवे ठाणे'?- 100 चौ किमी खासगी जमिनीवर शहराचा प्रस्ताव - सर्व इमारतींच्या बांधकामाला 1 एफएसआय दिला जाईल- या शहरात 20 लाख लोक राहू शकतील- जमिनीचे मालक असलेले शेतकरीच नव्या शहराचा विकास करतील- ठाणे खाडीचं सौंदर्यीकरण केलं जाईल- नव्या शहराला जोडणारा बायपास MMRDA बांधेलया नव्या ठाण्यासाठी घोडबंदरवरील वाहतूक ठाणे बायपास मार्गे.. म्हणजेच ठाणे खाडीच्या पूर्वे कडून नेण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ठाणे शहराची वाहतूक कोंडी कमी होईल. भिवंडी शहराच्या विकासालाही फायदा होईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली असली तरी शहराच्या उभारणीत अनेक अडचणी येण्याच्या शक्यता आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2012 01:55 PM IST

आता नविन ठाणे शहर !

विनय म्हात्रे, ठाणे

16 जून

मुंबई वरील भार कमी करण्यासाठी ज्या पध्दतीनं नवी मुंबई शहर वसवलं. त्याच पध्दतीनं ठाणे शहरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नविन ठाणे शहर तयार करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेनं नेमलेल्या कन्सल्टन्टने हा प्रस्ताव तयार केलाय. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी ही हिरवा कंदील दाखवला.

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेलं ठाणे शहर अक्राळ विक्राळ वाढू लागलंय. इथल्या लोकसंख्येत दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढ होतेय. त्यामुळे शहराचा काही भाग आता अभयारण्यात शिरू पाहतोय. ठाण्याच्या वाहतुकीचा ताणही कमालीचा वाढला आहे. यावरच उपाय म्हणून ठाणे खाडी ते भिवंडी बायपास यामधली सुमारे 100 चौरस किलो मिटर जागेत नवं शहर उभारण्याचा प्रस्ताव आहे.आता 'नवे ठाणे'?

- 100 चौ किमी खासगी जमिनीवर शहराचा प्रस्ताव - सर्व इमारतींच्या बांधकामाला 1 एफएसआय दिला जाईल- या शहरात 20 लाख लोक राहू शकतील- जमिनीचे मालक असलेले शेतकरीच नव्या शहराचा विकास करतील- ठाणे खाडीचं सौंदर्यीकरण केलं जाईल- नव्या शहराला जोडणारा बायपास MMRDA बांधेल

या नव्या ठाण्यासाठी घोडबंदरवरील वाहतूक ठाणे बायपास मार्गे.. म्हणजेच ठाणे खाडीच्या पूर्वे कडून नेण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ठाणे शहराची वाहतूक कोंडी कमी होईल. भिवंडी शहराच्या विकासालाही फायदा होईल.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली असली तरी शहराच्या उभारणीत अनेक अडचणी येण्याच्या शक्यता आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2012 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close