S M L

संस्थासम्राटाचा जि.प.च्या शाळेवर कब्जा

18 जूनजळगाव जिल्ह्यातील सत्रासेन या गावात एका खासगी संस्थाचालकाने जिल्हा परिषदेच्या शाळेवरच ताबा मिळवल्याची बाब स्पष्ट झाली आहे. आदिवासीबहुल असलेल्या या गावात 1980 पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा होती. मात्र नंतर रायसिंग भादले या संस्थाचालकांनी या शाळेवर ताबा मिळवत तिथं आपली आश्रम शाळा सुरू केली. तब्बल 32 वर्षांनंतर जाग आलेल्या जिल्हा परिषदेनं यावर्षीपासून शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भादले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी करत हा प्रयत्न हाणून पाडला. संस्था चालकांना याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 18, 2012 12:10 PM IST

संस्थासम्राटाचा जि.प.च्या शाळेवर कब्जा

18 जून

जळगाव जिल्ह्यातील सत्रासेन या गावात एका खासगी संस्थाचालकाने जिल्हा परिषदेच्या शाळेवरच ताबा मिळवल्याची बाब स्पष्ट झाली आहे. आदिवासीबहुल असलेल्या या गावात 1980 पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा होती. मात्र नंतर रायसिंग भादले या संस्थाचालकांनी या शाळेवर ताबा मिळवत तिथं आपली आश्रम शाळा सुरू केली. तब्बल 32 वर्षांनंतर जाग आलेल्या जिल्हा परिषदेनं यावर्षीपासून शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भादले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी करत हा प्रयत्न हाणून पाडला. संस्था चालकांना याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2012 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close