S M L

'प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होतील'

16 जूनराष्ट्रपतीपदी प्रणव मुखर्जीच विराजमान होतील, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे तसेच सपा आणि बसपाच्या पाठिंब्यामुळे बहुमताचा आकडा गाठता आला आहे जर तृणमूलने पाठिंबा दिला तर प्रणवदांची बिनविरोध निवड होऊ शकेल. ममताही आपला पाठिंबा देतील असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. काल शुक्रवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या नावाची घोषणा केली. यापाठोपाठ समाजवादी पार्टीने प्रणवदांना पाठिंबा जाहीर केली आणि काही वेळानंतर बसपाच्या अध्यक्षा मायवती यांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला. तसेच इतर पक्षांनीही प्रणवदांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. याबळावर 49 टक्के मते प्रणवदांकडे आहेत. त्यांना आता केवळ 2 टक्के मतं हवी आहेत. बीजेडी आणि तृणमूल काँग्रेस जरी कलाम यांच्या नावावर ठाम असले, तरी कलाम लवकरच माघार घोषित करण्याची शक्यता आहे. पी ए संगमा मात्र निडवणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे मुखर्जी विरुद्ध संगमा अशी लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींच्या घरी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात राष्ट्रपतीपदाबद्दल काहीही निर्णय होऊ शकला नाही. उद्या लालकृष्ण अडवाणींच्या घरी एनडीएची बैठक होतेय. त्यात याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मुदत 20 जूनपर्यंत आहे. राम जेठमलानी राष्ट्रपतीपदाच्या रिंगणातभाजपचे नेते राम जेठमलानी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत. प्रणव मुखर्जी यांच्या विरोधात आपण लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. प्रणवदांनी काळ्या पैशांच्या प्रश्नावर काहीच केलं नाही. त्यामुळं त्यांना आपला विरोध असल्याचं जेठमलानी यांनी म्हटलंय. भाजपला आपण आपला निर्णय कळवला आहे पण पक्षांने पाठिंबा दिला नाही तरी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं हा निर्णय व्यक्तिगत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2012 04:00 PM IST

'प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होतील'

16 जून

राष्ट्रपतीपदी प्रणव मुखर्जीच विराजमान होतील, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे तसेच सपा आणि बसपाच्या पाठिंब्यामुळे बहुमताचा आकडा गाठता आला आहे जर तृणमूलने पाठिंबा दिला तर प्रणवदांची बिनविरोध निवड होऊ शकेल. ममताही आपला पाठिंबा देतील असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

काल शुक्रवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या नावाची घोषणा केली. यापाठोपाठ समाजवादी पार्टीने प्रणवदांना पाठिंबा जाहीर केली आणि काही वेळानंतर बसपाच्या अध्यक्षा मायवती यांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला. तसेच इतर पक्षांनीही प्रणवदांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. याबळावर 49 टक्के मते प्रणवदांकडे आहेत. त्यांना आता केवळ 2 टक्के मतं हवी आहेत.

बीजेडी आणि तृणमूल काँग्रेस जरी कलाम यांच्या नावावर ठाम असले, तरी कलाम लवकरच माघार घोषित करण्याची शक्यता आहे. पी ए संगमा मात्र निडवणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे मुखर्जी विरुद्ध संगमा अशी लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींच्या घरी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात राष्ट्रपतीपदाबद्दल काहीही निर्णय होऊ शकला नाही. उद्या लालकृष्ण अडवाणींच्या घरी एनडीएची बैठक होतेय. त्यात याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मुदत 20 जूनपर्यंत आहे.

राम जेठमलानी राष्ट्रपतीपदाच्या रिंगणात

भाजपचे नेते राम जेठमलानी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत. प्रणव मुखर्जी यांच्या विरोधात आपण लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. प्रणवदांनी काळ्या पैशांच्या प्रश्नावर काहीच केलं नाही. त्यामुळं त्यांना आपला विरोध असल्याचं जेठमलानी यांनी म्हटलंय. भाजपला आपण आपला निर्णय कळवला आहे पण पक्षांने पाठिंबा दिला नाही तरी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं हा निर्णय व्यक्तिगत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2012 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close