S M L

'क्रिमिलेअर' अट रद्द करण्यासाठी 'विद्यार्थी भारती'चे आंदोलन

18 जूनराज्य सरकारने चालू शैक्षणिक वर्षापासून मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शुल्क सवलतीत दोन लाखांची 'क्रिमीलेअर' अट लागू करण्यात आली आहे याविरोधात `विद्यार्थी भारती` या संघटनेनं आज मंत्रालयासमोर आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मंत्रालयाच्या गेटला ताळं ठोकण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारविरोधात फलकही झळकवण्यात आली. मात्र पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी क्रिमिलेअरची अट रद्द करावी, 2 लाख उत्तपन्नाचं बंधन आणि 2 मुलांपर्यंत आरक्षणाची सवलत रद्द करावी अशा या संघटनेच्या मुख्य मागण्या आहे. मागिल आठवड्यात राज्य सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या स्कॉलरशिपबद्दल नव्याने नियम लागू केले. यामध्ये मागसवर्गीय कुटुंबातील एका घरातील दोन मुलांना स्कॉलरशिप घेता येणार नाही. पण एक मुलगा आणि मुलगी असेल किंवा दोन्ही मुली असतील तर दोघांना स्कॉलरशिप घेता येईल. तसेच एस्सी,एसटी,ओबीसी,एनटी आणि इतर मागसवर्गीय विद्यार्थांना व्यावसायिक शिक्षणासाठी दोन लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा लागू करण्यात आली आहे. यापुर्वी एस्सी वगळता ही मर्यादा एक लाख होती. चालू शैक्षणिक वर्षापासून हे नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मागसवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 18, 2012 12:47 PM IST

'क्रिमिलेअर' अट रद्द करण्यासाठी 'विद्यार्थी भारती'चे आंदोलन

18 जून

राज्य सरकारने चालू शैक्षणिक वर्षापासून मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शुल्क सवलतीत दोन लाखांची 'क्रिमीलेअर' अट लागू करण्यात आली आहे याविरोधात `विद्यार्थी भारती` या संघटनेनं आज मंत्रालयासमोर आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मंत्रालयाच्या गेटला ताळं ठोकण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारविरोधात फलकही झळकवण्यात आली. मात्र पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी क्रिमिलेअरची अट रद्द करावी, 2 लाख उत्तपन्नाचं बंधन आणि 2 मुलांपर्यंत आरक्षणाची सवलत रद्द करावी अशा या संघटनेच्या मुख्य मागण्या आहे.

मागिल आठवड्यात राज्य सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या स्कॉलरशिपबद्दल नव्याने नियम लागू केले. यामध्ये मागसवर्गीय कुटुंबातील एका घरातील दोन मुलांना स्कॉलरशिप घेता येणार नाही. पण एक मुलगा आणि मुलगी असेल किंवा दोन्ही मुली असतील तर दोघांना स्कॉलरशिप घेता येईल. तसेच एस्सी,एसटी,ओबीसी,एनटी आणि इतर मागसवर्गीय विद्यार्थांना व्यावसायिक शिक्षणासाठी दोन लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा लागू करण्यात आली आहे. यापुर्वी एस्सी वगळता ही मर्यादा एक लाख होती. चालू शैक्षणिक वर्षापासून हे नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मागसवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2012 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close