S M L

टोलविरोधात मनसेचं आंदोलन एक दिवस पुढे ढकलले

18 जून टोल नाक्यांचा हिशेब तपासण्यासाठी मनसेचं राज्यभर सुरू होणारं आंदोलन एक दिवस पुढं ढकलण्यात आलं आहे. आता उद्यापासून हे आंदोलन सुरू होणार आहे. पूर्व तयारीसाठी थोडा वेळ हवा असल्यानं आंदोलन एका दिवसासाठी पुढं ढकलण्यात आल्याचं मनसेनं म्हटलं आहे. कंत्राटदार खोटी माहिती देतात असा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनाची घोषणा केली होती. प्रत्येक टोल नाक्यावर मनसेचे 50 कार्यकर्ते 15 दिवस गाड्यांची मोजणी करणार आहेत. या कार्यकर्त्यांना कंत्राटदारांकडून त्रास झाल्यास त्याचे राज्यभर परिणाम होतील असा इशाराही राज यांनी दिला होता. त्यामुळे हे आंंदोलन कसं पार पडतं याकडं सगळ्यांचं लक्षं लागलंय. दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा बजावून ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 18, 2012 05:17 PM IST

टोलविरोधात मनसेचं आंदोलन एक दिवस पुढे ढकलले

18 जून

टोल नाक्यांचा हिशेब तपासण्यासाठी मनसेचं राज्यभर सुरू होणारं आंदोलन एक दिवस पुढं ढकलण्यात आलं आहे. आता उद्यापासून हे आंदोलन सुरू होणार आहे. पूर्व तयारीसाठी थोडा वेळ हवा असल्यानं आंदोलन एका दिवसासाठी पुढं ढकलण्यात आल्याचं मनसेनं म्हटलं आहे. कंत्राटदार खोटी माहिती देतात असा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनाची घोषणा केली होती. प्रत्येक टोल नाक्यावर मनसेचे 50 कार्यकर्ते 15 दिवस गाड्यांची मोजणी करणार आहेत. या कार्यकर्त्यांना कंत्राटदारांकडून त्रास झाल्यास त्याचे राज्यभर परिणाम होतील असा इशाराही राज यांनी दिला होता. त्यामुळे हे आंंदोलन कसं पार पडतं याकडं सगळ्यांचं लक्षं लागलंय. दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा बजावून ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2012 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close