S M L

कोल्हापुरात इतर तालुक्यात काविळची साथ पसरली

20 जूनकोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील काविळची साथ ही आता इतर तालुक्यामध्येही पसरु लागली आहे. कोल्हापूर शहरात 26, शिरोळ तालुक्यात 29, पाटपन्हाळे 6 तर इचलकरंजीमध्ये 15 नव्याने आढळले आहेत. इचलकरंजीतील जलवाहिनीची तपासणी सुरु करण्यात आली आहे. पण अजूनही प्रदुषित पाणी प्यायला लागत असल्याने काविळची साथ आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नाही. काविळीच्या साथीने आतापर्यंत 21 जणांचा बळी गेलाय. काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज सरकारने तातडीने 25 लाखांची औषधं जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली. कायमस्वरूपी आयसीयू उभारण्यासाठी लागणार्‍या निधीलाही सरकारनं तत्वतः मान्यता दिली. तसेच काल मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काविळाच्या साथीनं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाखांच्या मदतीची घोषणा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 20, 2012 09:36 AM IST

20 जून

कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील काविळची साथ ही आता इतर तालुक्यामध्येही पसरु लागली आहे. कोल्हापूर शहरात 26, शिरोळ तालुक्यात 29, पाटपन्हाळे 6 तर इचलकरंजीमध्ये 15 नव्याने आढळले आहेत. इचलकरंजीतील जलवाहिनीची तपासणी सुरु करण्यात आली आहे. पण अजूनही प्रदुषित पाणी प्यायला लागत असल्याने काविळची साथ आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नाही. काविळीच्या साथीने आतापर्यंत 21 जणांचा बळी गेलाय. काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज सरकारने तातडीने 25 लाखांची औषधं जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली. कायमस्वरूपी आयसीयू उभारण्यासाठी लागणार्‍या निधीलाही सरकारनं तत्वतः मान्यता दिली. तसेच काल मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काविळाच्या साथीनं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाखांच्या मदतीची घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2012 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close