S M L

टेनिस असोसिएशनचा लिएंडर पेसला पाठिंबा

19 जूनभारतीय टेनिसमध्ये रंगलेल्या वादाची दखल क्रीडा मंत्रालयाने घेतल्यानंतर भारतीय टेनिस असोसिएशनने या वादाबद्दल आता स्पष्टीकरण दिलंय. त्यावर असोसिएशननं लिएंडर पेसची पाठराखण केली आहे. जागतिक क्रमवारीत पेस सध्या टॉप 10 सीडमध्ये आहे आणि त्यामुळे त्याला त्याचा जोडीदार निवडण्याचा संपूर्ण अधिकार आहे असं स्पष्ट करत टेनिस असोसिएशनने भूपती आणि बोपन्ना या दोन्ही खेळाडूंना खडसावलंय. लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत दोन वेगवेगळ्या टीम का खेळवल्या जाऊ नये यासंदर्भात क्रीडा मंत्रालयानं स्पष्टीकरण मागवलं होतं. पेस आणि भूपती ही जोडी ऑलिम्पिक प्रवेशासाठी का योग्य आहे हे यात स्पष्ट केलं गेलंय. असं जरी असलं तरी अजूनही ऑलिम्पिकसाठी टीम निवडण्याचा पेच सुटला नाही. टीम जाहीर करण्याची 21 जून ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे अंतिम निर्णय काय घेतला जातोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भारतीय टेनिस असोसिएशनकडे 5 पर्याय उपलब्ध1 - लिएंडर पेस आणि महेश भूपतीनं एकत्र खेळावं2 - जर भूपतीनं नकार दिला तर रोहन बोपण्णानं पेससोबत खेळावं3 - जर बोपण्णानंही नकार दिला तर पेस कमी रँकिंगच्या खेळाडूसोबत खेळेल (सोमदेव देवबर्मन)4 - भूपती-बोपण्णा ऑलिम्पिकमध्ये एकत्र खेळतील आणि पेसला ऑलिम्पिकला मुकावं लागेल5 - भूपती आणि बोपण्णाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाईल

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2012 01:55 PM IST

टेनिस असोसिएशनचा लिएंडर पेसला पाठिंबा

19 जून

भारतीय टेनिसमध्ये रंगलेल्या वादाची दखल क्रीडा मंत्रालयाने घेतल्यानंतर भारतीय टेनिस असोसिएशनने या वादाबद्दल आता स्पष्टीकरण दिलंय. त्यावर असोसिएशननं लिएंडर पेसची पाठराखण केली आहे. जागतिक क्रमवारीत पेस सध्या टॉप 10 सीडमध्ये आहे आणि त्यामुळे त्याला त्याचा जोडीदार निवडण्याचा संपूर्ण अधिकार आहे असं स्पष्ट करत टेनिस असोसिएशनने भूपती आणि बोपन्ना या दोन्ही खेळाडूंना खडसावलंय. लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत दोन वेगवेगळ्या टीम का खेळवल्या जाऊ नये यासंदर्भात क्रीडा मंत्रालयानं स्पष्टीकरण मागवलं होतं. पेस आणि भूपती ही जोडी ऑलिम्पिक प्रवेशासाठी का योग्य आहे हे यात स्पष्ट केलं गेलंय. असं जरी असलं तरी अजूनही ऑलिम्पिकसाठी टीम निवडण्याचा पेच सुटला नाही. टीम जाहीर करण्याची 21 जून ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे अंतिम निर्णय काय घेतला जातोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

भारतीय टेनिस असोसिएशनकडे 5 पर्याय उपलब्ध

1 - लिएंडर पेस आणि महेश भूपतीनं एकत्र खेळावं2 - जर भूपतीनं नकार दिला तर रोहन बोपण्णानं पेससोबत खेळावं3 - जर बोपण्णानंही नकार दिला तर पेस कमी रँकिंगच्या खेळाडूसोबत खेळेल (सोमदेव देवबर्मन)4 - भूपती-बोपण्णा ऑलिम्पिकमध्ये एकत्र खेळतील आणि पेसला ऑलिम्पिकला मुकावं लागेल5 - भूपती आणि बोपण्णाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2012 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close