S M L

नाशिकच्या गंगापूर धरणातून खुलेआम पाणीचोरी

21 जूननाशिककरांवर पाणीकपातीचं संकट असताना एक उद्योजक थेट गंगापूर धरणातून पाणीचोरी करत असल्याचं उघड झालं आहे. गंगापूर धरणात सध्या पाण्याची पातळी घसरली. त्यामुळे नाशिकमध्ये पिण्याच्या पाण्यात कपात करण्यात आली. मात्र, याच गंगापूर धरणातून 'सुला वाईन्स' या मद्य उत्पादक कंपनीने थेट पाईपलाईन लावून पाण्याचा उपसा सुरू केला आहे. वाईनरीपर्यंत पाणी पोहोचत नाही म्हणून थेट धरणात जनरेटरही उभं करण्यात आलंय. अर्थात वीनयार्ड म्हणजे शेतीच्या नावाखाली हे पाणी उचलण्यात येत असलं तरी कपातीच्या काळात ते नियमाविरुद्ध आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2012 11:01 AM IST

नाशिकच्या गंगापूर धरणातून खुलेआम पाणीचोरी

21 जून

नाशिककरांवर पाणीकपातीचं संकट असताना एक उद्योजक थेट गंगापूर धरणातून पाणीचोरी करत असल्याचं उघड झालं आहे. गंगापूर धरणात सध्या पाण्याची पातळी घसरली. त्यामुळे नाशिकमध्ये पिण्याच्या पाण्यात कपात करण्यात आली. मात्र, याच गंगापूर धरणातून 'सुला वाईन्स' या मद्य उत्पादक कंपनीने थेट पाईपलाईन लावून पाण्याचा उपसा सुरू केला आहे. वाईनरीपर्यंत पाणी पोहोचत नाही म्हणून थेट धरणात जनरेटरही उभं करण्यात आलंय. अर्थात वीनयार्ड म्हणजे शेतीच्या नावाखाली हे पाणी उचलण्यात येत असलं तरी कपातीच्या काळात ते नियमाविरुद्ध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2012 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close