S M L

'आदर्श'ची कागदपत्र सुरक्षित ?

21 जूनमंत्रालयात नगरविकास खाते चौथ्या मजल्यावर असल्यामुळे लागलेली आग ही आदर्शची कागदपत्र जाळण्यासाठी लावण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आले होते मात्र आदर्श सोसायटी घोटाळ्याची कागदपत्र सीबीआय आणि हायकोर्टाकडे असल्यामुळे कागदपत्र जाळण्याचा आणि आगीचा संबंध नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. या अगोदरही मंत्रालयातून आदर्शची फाईल मंत्रालयातून गहाळ होण्याचा प्रकार घडला होता. आणि आज लागलेली आग ही आरोपींना कायमची सुटका करण्यासाठी लावण्यात आल्याची चर्चा रंगली होती. सोशलनेटवर्किंग साईटवर अनेकांनी असा संशय व्यक्त केला. मात्र, आदर्शची फाईल गहाळ झाल्यापासून सीबीआयने खबरदारी घेत कागदपत्र आपल्या ताब्यात ठेवली. तसेच नगरविकास खात्याच्या सर्व फाईल्स स्कॅन आहेत. 3 कोटी 50 लाख कागदांच स्कॅनिंग करण्यात आलं होतं आणि बॅकपही घेण्यात आला त्यामुळे खात्यातील सगळे कागदपत्रं सुरक्षित असल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2012 02:13 PM IST

'आदर्श'ची कागदपत्र सुरक्षित ?

21 जून

मंत्रालयात नगरविकास खाते चौथ्या मजल्यावर असल्यामुळे लागलेली आग ही आदर्शची कागदपत्र जाळण्यासाठी लावण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आले होते मात्र आदर्श सोसायटी घोटाळ्याची कागदपत्र सीबीआय आणि हायकोर्टाकडे असल्यामुळे कागदपत्र जाळण्याचा आणि आगीचा संबंध नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. या अगोदरही मंत्रालयातून आदर्शची फाईल मंत्रालयातून गहाळ होण्याचा प्रकार घडला होता. आणि आज लागलेली आग ही आरोपींना कायमची सुटका करण्यासाठी लावण्यात आल्याची चर्चा रंगली होती. सोशलनेटवर्किंग साईटवर अनेकांनी असा संशय व्यक्त केला. मात्र, आदर्शची फाईल गहाळ झाल्यापासून सीबीआयने खबरदारी घेत कागदपत्र आपल्या ताब्यात ठेवली. तसेच नगरविकास खात्याच्या सर्व फाईल्स स्कॅन आहेत. 3 कोटी 50 लाख कागदांच स्कॅनिंग करण्यात आलं होतं आणि बॅकपही घेण्यात आला त्यामुळे खात्यातील सगळे कागदपत्रं सुरक्षित असल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2012 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close