S M L

मंत्रालयाच्या मागील इमारतीत सोमवारपासून कामकाज

23 जूनमंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर आता इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरू झालंय.मंत्रालयातील मागील ऍनेक्स इमारतीत सोमवारी कामकाज सुरु होणार आहे. या इमारतीला आगीची झळ पोहचू न शकल्यामुळे काहीही नुकसान होऊ शकले नाही. तसेच आगीचं कारण शोधण्यासाठी फायर ब्रिगडचे अधिकारीही इमारतीची पाहणी करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानभवनात बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर आर पाटील, वेगवेगळ्या खात्यांचे सचिव उपस्थित होते. त्यात प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर गेले दोन दिवस बंद असलेला मंत्रालयाच्या समोरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, मंत्रालयाच्या समोरच्या प्रशासकीय इमारतीत उभारण्यात आलेल्या कंट्रोल रूमची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी केली. तेथील अधिकार्‍यांना यावेळी त्यांनी योग्य त्या सूचना केल्या. मंत्रालय आग प्रकरणी क्राइम ब्रँचची पथकं मंत्रालयाच्या जळालेल्या तीन्ही मजल्यावर पाहणी करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2012 09:46 AM IST

मंत्रालयाच्या मागील इमारतीत सोमवारपासून कामकाज

23 जून

मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर आता इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरू झालंय.मंत्रालयातील मागील ऍनेक्स इमारतीत सोमवारी कामकाज सुरु होणार आहे. या इमारतीला आगीची झळ पोहचू न शकल्यामुळे काहीही नुकसान होऊ शकले नाही. तसेच आगीचं कारण शोधण्यासाठी फायर ब्रिगडचे अधिकारीही इमारतीची पाहणी करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानभवनात बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर आर पाटील, वेगवेगळ्या खात्यांचे सचिव उपस्थित होते. त्यात प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर गेले दोन दिवस बंद असलेला मंत्रालयाच्या समोरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, मंत्रालयाच्या समोरच्या प्रशासकीय इमारतीत उभारण्यात आलेल्या कंट्रोल रूमची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी केली. तेथील अधिकार्‍यांना यावेळी त्यांनी योग्य त्या सूचना केल्या. मंत्रालय आग प्रकरणी क्राइम ब्रँचची पथकं मंत्रालयाच्या जळालेल्या तीन्ही मजल्यावर पाहणी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2012 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close