S M L

मंत्रालयाच्या आगीत मृतांची संख्या पाचवर

22 जूनमंत्रालयात लागलेल्या भीषण आगीत बळी गेलेल्यांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे. काल संध्याकाळी सहाव्या मजल्यावर उमेश कोतेकर, महेश गुघळे आणि शिवाजी कोर्डे या तिघांची ओळख पटली आहे. तर सहाव्या मजल्यावर आज सकाळी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. या दोघांची ओळख अजून पटलेली नाही. काल लागलेल्या भीषण आगीत तीन मजले जळून खाक झाले आहे. दरम्यान, कामकाजासाठी सरकारच्या इतर बिल्डिंगमध्ये सोय करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरू झालंय. या आगीत मुख्यमंत्र्यांची कॅबिनही पूर्णपणे जळून खाक झाली असं सांगितलं जात होतं. वीटांचं बांधकाम असल्यानं हे चेंबर तसंच राहिल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. तर इतर मंत्र्यांच्या केबिन या लाकडाच्या पार्टीशनच्या असल्यानं त्या जळून खाक झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2012 08:18 AM IST

मंत्रालयाच्या आगीत मृतांची संख्या पाचवर

22 जून

मंत्रालयात लागलेल्या भीषण आगीत बळी गेलेल्यांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे. काल संध्याकाळी सहाव्या मजल्यावर उमेश कोतेकर, महेश गुघळे आणि शिवाजी कोर्डे या तिघांची ओळख पटली आहे. तर सहाव्या मजल्यावर आज सकाळी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. या दोघांची ओळख अजून पटलेली नाही. काल लागलेल्या भीषण आगीत तीन मजले जळून खाक झाले आहे. दरम्यान, कामकाजासाठी सरकारच्या इतर बिल्डिंगमध्ये सोय करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरू झालंय. या आगीत मुख्यमंत्र्यांची कॅबिनही पूर्णपणे जळून खाक झाली असं सांगितलं जात होतं. वीटांचं बांधकाम असल्यानं हे चेंबर तसंच राहिल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. तर इतर मंत्र्यांच्या केबिन या लाकडाच्या पार्टीशनच्या असल्यानं त्या जळून खाक झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2012 08:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close