S M L

मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतच अक्षम्य चुका

22 जूनराज्याचा कारभाराचा गाडा हाकणार्‍या मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर तीन मजले कोळसा झाले आहे. पण या इमारतीला इतकी भीषण आग लागली याला जबाबदार कोण याचे उत्तर शोधले जात आहे. पण याला जबाबदारही संरक्षण यंत्रणाच होती. गेल्या 4 वर्षांत मंत्रालयाचं फायर ऑडिटचं झालं नाही. तसेच मंत्र्यांच्या केबिनच्या सजावटीचे अपडेट नकाशेही अग्निशमन दलाकडे नाही. 1955 साली बांधण्यात आलेल्या या वास्तूचे 2008 पासून फायर ऑडिट नाहीच. विशेष म्हणजे मंत्र्यांच्या चहापानाची व्यवस्था करण्यासाठी कँटिनही केबिनला खेटूनच होती. ही आग भडकण्यामागे काही गंभीर कारणं आहेत. ही आग इतकी का वाढली ?अक्षम्य चुका : याला जबाबदार कोण ? - 2008 पासून मंत्रालयाचं फायर ऑडिट नाही- शेवटचं फायर ऑडिट 2008 मध्ये - गेल्या 4 वर्षांतल्या अंतर्गत सजावटीचे नकाशे नाही - सजावटीसाठी प्रचंड प्रमाणात लाकूड, प्लायवूड आणि प्लॅस्टिकचा वापर - मंत्र्यांच्या केबिन शेजारी छोटे कँटीन - कँटीनमध्ये गॅस सिलेंडरचा वापर- अग्निशमन दलाकडे मंत्रालयाचा अपडेट नकाशा नाही- मंत्रालयातल्या मोकळ्या जागा लाकडी कपाटं आणि फाइल्सनं व्यापलेल्या - मंत्रालयातल्या आग विझवणार्‍या यंत्रणेची तपासणी झाली नव्हतीआयबीएन लोकमतचे सवाल - गेल्या 4 वर्षंात फायर ऑडिट का झालं नाही ?- आग विझवण्याच्या यंत्रणेची तपासणी का नाही ?- मंत्रालयातली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा का कोलमडली ?- 4 हजार कर्मचार्‍यांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं होतं का ?- केबिनची सजावट करताना परवानगी घेतली होती का ?- मंत्रालयाचा अपडेट नकाशा का नाही ?- केबिन शेजारी कँटीन बनवण्याची परवानगी कोणी दिली ?

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2012 08:31 AM IST

मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतच अक्षम्य चुका

22 जून

राज्याचा कारभाराचा गाडा हाकणार्‍या मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर तीन मजले कोळसा झाले आहे. पण या इमारतीला इतकी भीषण आग लागली याला जबाबदार कोण याचे उत्तर शोधले जात आहे. पण याला जबाबदारही संरक्षण यंत्रणाच होती. गेल्या 4 वर्षांत मंत्रालयाचं फायर ऑडिटचं झालं नाही. तसेच मंत्र्यांच्या केबिनच्या सजावटीचे अपडेट नकाशेही अग्निशमन दलाकडे नाही. 1955 साली बांधण्यात आलेल्या या वास्तूचे 2008 पासून फायर ऑडिट नाहीच. विशेष म्हणजे मंत्र्यांच्या चहापानाची व्यवस्था करण्यासाठी कँटिनही केबिनला खेटूनच होती. ही आग भडकण्यामागे काही गंभीर कारणं आहेत. ही आग इतकी का वाढली ?अक्षम्य चुका : याला जबाबदार कोण ?

- 2008 पासून मंत्रालयाचं फायर ऑडिट नाही- शेवटचं फायर ऑडिट 2008 मध्ये - गेल्या 4 वर्षांतल्या अंतर्गत सजावटीचे नकाशे नाही - सजावटीसाठी प्रचंड प्रमाणात लाकूड, प्लायवूड आणि प्लॅस्टिकचा वापर - मंत्र्यांच्या केबिन शेजारी छोटे कँटीन - कँटीनमध्ये गॅस सिलेंडरचा वापर- अग्निशमन दलाकडे मंत्रालयाचा अपडेट नकाशा नाही- मंत्रालयातल्या मोकळ्या जागा लाकडी कपाटं आणि फाइल्सनं व्यापलेल्या - मंत्रालयातल्या आग विझवणार्‍या यंत्रणेची तपासणी झाली नव्हती

आयबीएन लोकमतचे सवाल

- गेल्या 4 वर्षंात फायर ऑडिट का झालं नाही ?- आग विझवण्याच्या यंत्रणेची तपासणी का नाही ?- मंत्रालयातली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा का कोलमडली ?- 4 हजार कर्मचार्‍यांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं होतं का ?- केबिनची सजावट करताना परवानगी घेतली होती का ?- मंत्रालयाचा अपडेट नकाशा का नाही ?- केबिन शेजारी कँटीन बनवण्याची परवानगी कोणी दिली ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2012 08:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close