S M L

सर्व फाईल सुरक्षित, मंत्रालयाचे कामकाज विधानभवनातून -CM

22 जूनमंत्रालयाचा कारभार आता विधानभवनातून चालणार आहे. ज्या मंत्र्यांचे विभाग जळून खाक झालेत त्यांना पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आज राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक विधानभवनात झाली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी आदर्शच्या सर्व फाईल्स सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच सव्वा दोन लाख फाईल्स स्कॅन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कागदपत्रांचं नुकसान झालं असलं तरी माहिती सुरक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, सर्व मंत्र्यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. अत्यावश्यक दौर्‍यांनाच फक्त परवानगी देण्यात आलीये. प्रशासकीय कामावर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलंय. जे कॉम्प्युटर जळाले आहेत त्यांच्या हार्डडिस्क वाचवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच संध्याकाळी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून या बैठकीला विरोधीपक्षांच्या गटनेत्यांनाही बोलावण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2012 05:03 PM IST

सर्व फाईल सुरक्षित, मंत्रालयाचे कामकाज विधानभवनातून -CM

22 जून

मंत्रालयाचा कारभार आता विधानभवनातून चालणार आहे. ज्या मंत्र्यांचे विभाग जळून खाक झालेत त्यांना पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आज राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक विधानभवनात झाली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी आदर्शच्या सर्व फाईल्स सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच सव्वा दोन लाख फाईल्स स्कॅन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कागदपत्रांचं नुकसान झालं असलं तरी माहिती सुरक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, सर्व मंत्र्यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. अत्यावश्यक दौर्‍यांनाच फक्त परवानगी देण्यात आलीये. प्रशासकीय कामावर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलंय. जे कॉम्प्युटर जळाले आहेत त्यांच्या हार्डडिस्क वाचवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच संध्याकाळी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून या बैठकीला विरोधीपक्षांच्या गटनेत्यांनाही बोलावण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2012 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close