S M L

मंत्रालयाच्या अग्निशमन विभागाची दुरवस्था

25 जूनमंत्रालयाला लागलेल्या आगीशी संबंधित धक्कादायक माहिती आयबीएन लोकमतच्या हाती लागलीय. मंत्रालयातला अग्निशमन विभाग अतिशय दयनीय अवस्थेत आहे. या विभागात फक्त 7 माणसं काम करतात. त्यापैकी एक आहे फायर ऑफिसर आणि त्यांच्या सोबत काम करण्यासाठी फक्त 6 फायर फायटर्स..हा विभाग सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. पण या विभागाची परिस्थिती इतकी वाईट आहे की एका शिफ्टमध्ये फक्त एक फायर फायटर कामावर असतो. त्यांना धड युनिफॉर्मही नाही. आगीच्या घटनेवेळी अतिशय गरजेचे असणारे गमबूट, हँड ग्लोव्हज, हेलमेटसुद्धा या जवानांकडे नाही. इतकंच नाही तर पाण्याचे टँकरही या विभागाकडे नाही. आगीच्या घटनांच्या नोंदी ठेवण्यासाठी एकसुद्धा कॉम्प्युटर या विभागाकडे नाही. या विभागाचं कार्यालय तळमजल्यावर अतिशय अंधार्‍या आणि कोंदट खोलीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जवानांनी सरावही केलेला नाही. आगीच्या तपासाला वेगमंत्रायलयाला लागलेल्या आगीच्या तपासाला आता वेग आला आहे. आगीचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आलाय. आत्तापर्यंत 50 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. यात जखमी तसेच अग्निशमन अधिकार्‍यांचा समावेश आहे. आवश्यकता वाटल्यास मंत्र्यांचेही जबाब नोंदवले जातील, अशी माहिती तपासाचे प्रमुख हिमांशु रॉय यांनी सांगितलंय. मंत्रालयातल्या अग्निशमन यंत्रणेच्या देखभालीचं काम स्पॅन्को कंपनी सांभाळते. कंपनीच्या अधिकार्‍यांकडेही चौकशी करण्यात आली आहे. चौथ्या मजल्यावरच्या 411 नंबरच्या खोलीत सर्वात आधी आग लागली होती. त्या खोलीतला स्वीच बोर्डही तपासणीसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजही ताब्यात घेतलंय. मंत्रालयातील अग्नीशमन यंत्रणेच्या देखभालीचं काम स्पँन्को हि कंपनी करत असते.या कंपनीच्या अधिकार्‍यांकडे याबाबत चौकशी करण्यात आली आहे. मंत्रलयाच्या चौथ्या मजल्यावरील खोली क्रमांक 411 इथून आगीला सुरुवात झाली. त्या खोलीतील स्वीच बोर्ड तपासासाठी पाठवण्यात आलाय.आगीच्या या गुन्ह्याच्या तपासात आता पर्यंत 50 व्यक्तींच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. यात जखमी तसेच फायर ब्रिगेडच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय. त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.या तपासात इलेक्ट्रिक इंजिनियरिंग मधील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2012 03:16 PM IST

मंत्रालयाच्या अग्निशमन विभागाची दुरवस्था

25 जून

मंत्रालयाला लागलेल्या आगीशी संबंधित धक्कादायक माहिती आयबीएन लोकमतच्या हाती लागलीय. मंत्रालयातला अग्निशमन विभाग अतिशय दयनीय अवस्थेत आहे. या विभागात फक्त 7 माणसं काम करतात. त्यापैकी एक आहे फायर ऑफिसर आणि त्यांच्या सोबत काम करण्यासाठी फक्त 6 फायर फायटर्स..हा विभाग सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. पण या विभागाची परिस्थिती इतकी वाईट आहे की एका शिफ्टमध्ये फक्त एक फायर फायटर कामावर असतो. त्यांना धड युनिफॉर्मही नाही. आगीच्या घटनेवेळी अतिशय गरजेचे असणारे गमबूट, हँड ग्लोव्हज, हेलमेटसुद्धा या जवानांकडे नाही. इतकंच नाही तर पाण्याचे टँकरही या विभागाकडे नाही. आगीच्या घटनांच्या नोंदी ठेवण्यासाठी एकसुद्धा कॉम्प्युटर या विभागाकडे नाही. या विभागाचं कार्यालय तळमजल्यावर अतिशय अंधार्‍या आणि कोंदट खोलीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जवानांनी सरावही केलेला नाही.

आगीच्या तपासाला वेग

मंत्रायलयाला लागलेल्या आगीच्या तपासाला आता वेग आला आहे. आगीचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आलाय. आत्तापर्यंत 50 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. यात जखमी तसेच अग्निशमन अधिकार्‍यांचा समावेश आहे. आवश्यकता वाटल्यास मंत्र्यांचेही जबाब नोंदवले जातील, अशी माहिती तपासाचे प्रमुख हिमांशु रॉय यांनी सांगितलंय. मंत्रालयातल्या अग्निशमन यंत्रणेच्या देखभालीचं काम स्पॅन्को कंपनी सांभाळते. कंपनीच्या अधिकार्‍यांकडेही चौकशी करण्यात आली आहे. चौथ्या मजल्यावरच्या 411 नंबरच्या खोलीत सर्वात आधी आग लागली होती. त्या खोलीतला स्वीच बोर्डही तपासणीसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजही ताब्यात घेतलंय.

मंत्रालयातील अग्नीशमन यंत्रणेच्या देखभालीचं काम स्पँन्को हि कंपनी करत असते.या कंपनीच्या अधिकार्‍यांकडे याबाबत चौकशी करण्यात आली आहे. मंत्रलयाच्या चौथ्या मजल्यावरील खोली क्रमांक 411 इथून आगीला सुरुवात झाली. त्या खोलीतील स्वीच बोर्ड तपासासाठी पाठवण्यात आलाय.आगीच्या या गुन्ह्याच्या तपासात आता पर्यंत 50 व्यक्तींच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. यात जखमी तसेच फायर ब्रिगेडच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय. त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.या तपासात इलेक्ट्रिक इंजिनियरिंग मधील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2012 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close