S M L

राजस्थानात रंगतोय 'सास बहू' चा प्रचार

26 नोव्हेंबर, राजस्थानराजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी आता राजस्थानमध्ये निवडणुक प्रचारासाठी आपल्या सुनेला मैदानात उतरवलंय. आपल्या गुज्जर सुनेला पुढं करुन, गुज्जरांची मत पुन्हा भाजपकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.टीव्हीवरची लोकप्रिय सास-बहू सिरीयल बंद झालीय, पण राजस्थानच्या राजकारणात, सास-बहूची कथा सुरु झाली आहे.यात प्रमुख भूमिकेत आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसंुधरा राजे आणि त्यांच्या उच्च शिक्षित, इंग्रजी बोलणार्‍या आणि हो गुज्जर बहू निहारिका राजे. सिरीयलप्रमाणचं ही बहू देखील अत्यंत आज्ञाधारी आहे. या बहूचं काम आहे. आपल्या सासूवर नाराज असलेल्या गुज्जर समाजाची मतं पुन्हा सासूबाईकंडे वळवणं आणि त्यासाठी त्या जोरदार प्रचार करत आहेत.पण निहारिका राजेंचा गुज्जरांवर फारसा परिणाम होतांना दिसत नाहीये.गुज्जरांना अजून आठवतंय ते वसुंधरा राजेंनी दिलेलं आश्वासन, गुज्जरांच आंदोलन आणि त्यात गेलेले 70 बळी. "जेव्हा आम्ही लढत होतो, आमची अवस्था वाईट होती, तेव्हा निहारिकाजी पुढे आल्या असत्या तर आम्ही त्यांना योग्य तो सन्मान दिला असता" असं किशनगडचे नागरिक रामलाल यांनी सांगितलं.गेल्या निवडणुकीत वसुंधरा राजेंनी,गुज्जरांना अनुसुचीत जमातीचा दर्जा देण्याचं आश्वासन देत, मत मागितली होती.पण ते आश्वासन काही त्या पूर्ण करु शकल्या नाहीत.आता आपल्या सुनेला पुढं करुन त्या गुज्जरांची मन वळवण्याचा प्रयत्न करतायत.पण दुखावलेले गुज्जर पुन्हा वसुंधरा राजेंकडे जाणार का हे लवकरचं स्पष्ट होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2008 04:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2008 04:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close