S M L

'महिन्याभरात सगळ्या फाईल्स तयार करणार'

25 जूनअग्नितांडवात तीन मजले जळून खाक झाल्यानंतर 100 तासातच मंत्रालयात राज्याचा कारभार आजपासून सुरू झालाय. मंत्रालयातील तीन मजल्यात कामाला आज सुरुवात झाली आहेत. या आगीत झालेल्या नुकसानातून खबरदारी घेत यापुढे सर्व कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आगीत मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच मंत्रालयाच्या 27 टक्के भागाचं नुकसान झाल्यानं किती फाईल्स जळून खाक झाल्या आहेत याची माहिती लवकरत उपलब्ध होईल. नगरविकास खात्याच्या फाईल्स महिनाभरात तयार करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, या आगीच्या घटनेनंतर सर्व शासकीय इमारतींचं फायर ऑडिट केलं जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन वेळेवर म्हणजे 9 जुलैपासून सुरू होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2012 07:41 AM IST

'महिन्याभरात सगळ्या फाईल्स तयार करणार'

25 जून

अग्नितांडवात तीन मजले जळून खाक झाल्यानंतर 100 तासातच मंत्रालयात राज्याचा कारभार आजपासून सुरू झालाय. मंत्रालयातील तीन मजल्यात कामाला आज सुरुवात झाली आहेत. या आगीत झालेल्या नुकसानातून खबरदारी घेत यापुढे सर्व कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आगीत मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

तसेच मंत्रालयाच्या 27 टक्के भागाचं नुकसान झाल्यानं किती फाईल्स जळून खाक झाल्या आहेत याची माहिती लवकरत उपलब्ध होईल. नगरविकास खात्याच्या फाईल्स महिनाभरात तयार करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, या आगीच्या घटनेनंतर सर्व शासकीय इमारतींचं फायर ऑडिट केलं जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन वेळेवर म्हणजे 9 जुलैपासून सुरू होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2012 07:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close