S M L

..तर पुण्यात एकदिवसाआड पाणी - अजित पवार

26 जूनऐन पावसाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवलंय. 7 जुलैपर्यंत पाऊस आला नाही तर पुण्यात एक दिवसाआड पाणी सोडण्यात येणार आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिलीय. सात जुलैपर्यंत सध्या सुरू असलेला पाणीपुरवठा कायम असणार आहे. 7 जुलैला एक बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेण्यात येईल. तोपर्यंत पुण्यातल्या बिल्डर्सना बांधकाम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीटंचाईवर उपाय म्हणून पेशवेकालीन स्त्रोतांचाही पर्याय तपासण्यात येत आहे. मात्र याची शक्यता कमीच आहे. पावसाने 7 जूनला राज्यात आगमन करुन सुध्दा दडी मारल्यामुळे राज्यातील सगळ्याचं धरणांची पाणी पातळी खालावली आहे. राज्यासाठी चिंतेची बाब आहे असंही पवार म्हणाले. जर 7 जुलैपर्यंत चांगला आणि जोरदार पाऊस पडला नाही तर पाणीटंचाईच्या संकटाला पुणेकरांना सामोर जावं लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2012 10:21 AM IST

..तर पुण्यात एकदिवसाआड पाणी - अजित पवार

26 जून

ऐन पावसाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवलंय. 7 जुलैपर्यंत पाऊस आला नाही तर पुण्यात एक दिवसाआड पाणी सोडण्यात येणार आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिलीय. सात जुलैपर्यंत सध्या सुरू असलेला पाणीपुरवठा कायम असणार आहे. 7 जुलैला एक बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेण्यात येईल. तोपर्यंत पुण्यातल्या बिल्डर्सना बांधकाम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीटंचाईवर उपाय म्हणून पेशवेकालीन स्त्रोतांचाही पर्याय तपासण्यात येत आहे. मात्र याची शक्यता कमीच आहे. पावसाने 7 जूनला राज्यात आगमन करुन सुध्दा दडी मारल्यामुळे राज्यातील सगळ्याचं धरणांची पाणी पातळी खालावली आहे. राज्यासाठी चिंतेची बाब आहे असंही पवार म्हणाले. जर 7 जुलैपर्यंत चांगला आणि जोरदार पाऊस पडला नाही तर पाणीटंचाईच्या संकटाला पुणेकरांना सामोर जावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2012 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close