S M L

नवी मुंबई परिवहन सेवेचं खाजगीकरण वादाच्या भोवर्‍यात

26 नोव्हेंबर, मुंबईविनय म्हात्रे नवी मुंबई परिवहन सेवेचं खाजगीकरण होत आहे. या खाजगीकरणाच्या माध्यमातून परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन 300 बसेस येणार आहेत. पण खाजगीकरणाचा प्रस्तावच चुकीचा असल्यामुळे परिवहन सेवेचं खाजगीकरण केलं, तर याचा फायदा कुणालाच होणार नाहीये. या खाजगीकरणाच्या माध्यमातून ही परिवहन सेवा ठेकेदाराच्या घशात घालण्याचा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेत सध्या 235 बसेस आहेत.. शहराची वाढती लोकसंख्या पाहता बसेसचा ताफा वाढवणं गरजेचं आहे. परिवहन सेवेला नव्या बसेससाठी 50 कोटींचं कर्ज मिळवण्यासाठी दारोदार भटकावं लागलं. पण अस्वच्छ कारभारामुळे त्यांना कोणीच उभं केलं नाही. अखेरीस खाजगीकरणाचा प्रस्ताव पुढे आणला. पण त्यातही सावळा गोंधळ. परिवहन सेवेच्या नावावर असणार्‍या 300 बसेस ठेकेदाराकडून खरेदी केल्या जाणार आहेत. अहमदनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली आदि ठिकाणी अशा पध्दतीचा प्रस्ताव आणला गेला. पण तो जनतेच्या हिताचा ठरणार नसल्याची चर्चा आहे. "सत्ताधार्‍यांचा अंकुश नसल्यामुळे हे सर्व घडतयं" असा आरोप नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रमाकांत म्हात्रे यांनी केला आहे.आता खाजगीकरणाचा होतंय, नवीन वाद निर्माण झालेत. खाजगीकरणाचा जनतेच्या फायद्यासाठी की ठेकेदाराच्या, असा प्रश्न यानिमित्तानं पुढे आला आहे. परिवहन सेवेवर महापालिकेचा अंकुश असण्याऐवजी तिथं मात्र ठेकेदारांचच चालत असल्याचं चित्र आहे. परिवहन सेवेनं सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रस्तावाला विरोध झाल्यामुळं त्याला स्थगिती देण्यात आली आहे. "या प्रस्तावावर आधी अभ्यास के ला नव्हता, तो करुन प्रस्ताव मंजूर केला जाईल" असं नवी मुंबई परिवहन सेवेचे चेअरमन शशी दामोदरन यांनी सांगितलं.एकूणच हा खाजगीकरणाचा प्रस्ताव लांबणीवर पडलाय आणि त्याचा फैसला होईपर्यंत नव्या बसेस येण्याचा सुतराम संबंध नाही. अशा परिस्थितीत सामान्य नागरिक मात्र विनाकारण भरडला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2008 04:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2008 04:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close