S M L

फसवणूक करण्यार्‍या बिल्डराची 17 एकर जागा जप्त

26 जूनविरारमध्ये बिल्डरकडून फसवणूक झालेल्या जवळपास 800 ग्राहकांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. बिल्डरच्या जमिनीच्या लिलावाला हायकोर्टाने परवानगी दिली आहे. विरारमध्ये बिल्डर जयंत परांजपे यांनी घरं बाधण्यासाठी लोकांकडून पैसे घेतले होते. जे. पी. नगर योजनेच्या माध्यमातून जयंत परांजपेंनी स्वस्त दरात घरकुल योजना तयार केली होती. पण 20 वर्षं उलटून गेली तरी घरं बांधून दिली नव्हती. त्यामुळे जवळपास 800 ग्राहकांनी घेतली ग्राहक पंचायतीत धाव घेतली होती. हायकोर्टाने त्याची दखल घेऊन बिल्डरची जवळपास 17 एकर जागा जप्त करायला लावली. जागेच्या लिलावातून मिळणारे पैसे ग्राहकांना वाटण्यात येणार आहेत. उद्या सकाळी जागेचा लिलाव होणार आहे. लिलावासाठी 24 कोटी 48 लाख इतकी किमान बोली ठरवण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2012 04:09 PM IST

फसवणूक करण्यार्‍या बिल्डराची 17 एकर जागा जप्त

26 जून

विरारमध्ये बिल्डरकडून फसवणूक झालेल्या जवळपास 800 ग्राहकांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. बिल्डरच्या जमिनीच्या लिलावाला हायकोर्टाने परवानगी दिली आहे. विरारमध्ये बिल्डर जयंत परांजपे यांनी घरं बाधण्यासाठी लोकांकडून पैसे घेतले होते. जे. पी. नगर योजनेच्या माध्यमातून जयंत परांजपेंनी स्वस्त दरात घरकुल योजना तयार केली होती. पण 20 वर्षं उलटून गेली तरी घरं बांधून दिली नव्हती. त्यामुळे जवळपास 800 ग्राहकांनी घेतली ग्राहक पंचायतीत धाव घेतली होती. हायकोर्टाने त्याची दखल घेऊन बिल्डरची जवळपास 17 एकर जागा जप्त करायला लावली. जागेच्या लिलावातून मिळणारे पैसे ग्राहकांना वाटण्यात येणार आहेत. उद्या सकाळी जागेचा लिलाव होणार आहे. लिलावासाठी 24 कोटी 48 लाख इतकी किमान बोली ठरवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2012 04:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close