S M L

डॉ.मुंडेंवर होती पोलिसांची कृपा ?

27 जूनस्त्री भ्रूण हत्याप्रकरणी डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे हे सध्या तुरुंगात आहेत. मात्र, याआधी तब्बल 27 दिवस ते पोलिसांना गुंगारा देत फिरत होते. 18 मे रोजी जेव्हा विजयमाला पटेकर या महिलेचा अवैध गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्याच रात्री परळी पोलिसांनी डॉ. मुंडे दाम्पत्याला अटक केली होती आणि दुसर्‍याच दिवशी त्यांची जामिनावर सुटका झाली. डॉ. मुंडे दाम्पत्याची तेव्हा झालेली जामिनावरची सुटका ही आता वादात सापडलेय. डॉ. मुंडेंच्या अटकेसाठी बक्षीस जाहीर करणार्‍या पोलिसांनीच आधी डॉ. मुंडेंना जामीन द्यायला मदत केली असा आरोप आता करण्यात येतोय. कायद्याचे रखवालदार हेच कायद्यातल्या पळवाटा शोधून आरोपींना मदत करतात अशी तक्रार आता याप्रकरणात करण्यात येतेय. परळीचे न्यायाधीश आणि परळीतील पोलीस निरीक्षक यांनी कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असताना बेकायदा कृत्य केल्याचा ठपका अंबाजोगाई कोर्टानेच त्यांच्यावर ठेवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2012 02:03 PM IST

डॉ.मुंडेंवर होती पोलिसांची कृपा ?

27 जून

स्त्री भ्रूण हत्याप्रकरणी डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे हे सध्या तुरुंगात आहेत. मात्र, याआधी तब्बल 27 दिवस ते पोलिसांना गुंगारा देत फिरत होते. 18 मे रोजी जेव्हा विजयमाला पटेकर या महिलेचा अवैध गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्याच रात्री परळी पोलिसांनी डॉ. मुंडे दाम्पत्याला अटक केली होती आणि दुसर्‍याच दिवशी त्यांची जामिनावर सुटका झाली. डॉ. मुंडे दाम्पत्याची तेव्हा झालेली जामिनावरची सुटका ही आता वादात सापडलेय. डॉ. मुंडेंच्या अटकेसाठी बक्षीस जाहीर करणार्‍या पोलिसांनीच आधी डॉ. मुंडेंना जामीन द्यायला मदत केली असा आरोप आता करण्यात येतोय. कायद्याचे रखवालदार हेच कायद्यातल्या पळवाटा शोधून आरोपींना मदत करतात अशी तक्रार आता याप्रकरणात करण्यात येतेय. परळीचे न्यायाधीश आणि परळीतील पोलीस निरीक्षक यांनी कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असताना बेकायदा कृत्य केल्याचा ठपका अंबाजोगाई कोर्टानेच त्यांच्यावर ठेवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2012 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close