S M L

जळगावमध्ये सहा महिन्याच्या चिमुरडीचा जळून मृत्यू

27 जूनजळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात अवघ्या 6 महिन्याच्या चिमुरडीचा जळुन मृत्यू झाला. दर्शना गोपाळ चौधरी असं या मुलीचं नाव आहे. आईनंच आपल्या मुलीचा बळी घेतल्याचा पोलिसांचा संशय आहे. रावेर तालुक्यातील तांदलवाडी गावातील राहत्या घरी ही मुलगी जळाली होती. दर्शनाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून जरी नोंद केली असली तरी आई घरात असताना या चिमुरडीचा झालेला मृत्यू हा संशयास्पद असल्याचं बोललं जातंय. दुदैर्वाची गोष्ट म्हणजे या मुलीला जन्मापासून एका डोळ्यानं दिसत होतं. तिच्या उपचारासाठी या कुटुंबाचे 35 हजार रुपये खर्च झाले होते. घरची परीस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचारासाठी पैसे नसल्याने या मुलीचे हाल होत होते. निंभोरा पोलीस स्टेशनला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2012 02:42 PM IST

जळगावमध्ये सहा महिन्याच्या चिमुरडीचा जळून मृत्यू

27 जून

जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात अवघ्या 6 महिन्याच्या चिमुरडीचा जळुन मृत्यू झाला. दर्शना गोपाळ चौधरी असं या मुलीचं नाव आहे. आईनंच आपल्या मुलीचा बळी घेतल्याचा पोलिसांचा संशय आहे. रावेर तालुक्यातील तांदलवाडी गावातील राहत्या घरी ही मुलगी जळाली होती. दर्शनाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून जरी नोंद केली असली तरी आई घरात असताना या चिमुरडीचा झालेला मृत्यू हा संशयास्पद असल्याचं बोललं जातंय. दुदैर्वाची गोष्ट म्हणजे या मुलीला जन्मापासून एका डोळ्यानं दिसत होतं. तिच्या उपचारासाठी या कुटुंबाचे 35 हजार रुपये खर्च झाले होते. घरची परीस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचारासाठी पैसे नसल्याने या मुलीचे हाल होत होते. निंभोरा पोलीस स्टेशनला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2012 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close