S M L

म्हाडाच्या घरांसाठी गिरणी कामगारांचा रास्ता रोको

28 जूनगिरणी कामगारांच्या 6 हजार 925 घरांसाठी आज म्हाडातर्फे लॉटरी सुरू आहे. पण या लॉटरीला गिरणी कामगारांच्या 9 पैकी 6 संघटनांनी विरोध करत ही लॉटरी आज उधळून लावण्याचा इशारा दिला होता. पण पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्यानं या कामगारांनी वांद्रे इथं एसव्ही रोडवर रास्ता रोको आंदोलन केलं. सर्व 1 लाख 48 हजार कामगारांना मोफत घरं मिळाली पाहिजे अशी मागणी या कामगारांनी यावेळी केली. अखेर गिरणी कामगारांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी चर्चेसाठी बोलावल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. दरम्यान, 19 गिरण्यांमधील जागांवर बांधण्यात आलेल्या 6 हजार 925 घरांसाठी म्हाडाची लॉटरी सकाळपासून सुरू आहे. पहिल्या सत्रात 3 हजार 438 घरांसाठी लॉटरी झाली. तर आता दुसर्‍या उर्वरित घरांसाठी लॉटरीला सुरूवात झाली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही लॉटरी चालणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2012 10:01 AM IST

म्हाडाच्या घरांसाठी गिरणी कामगारांचा रास्ता रोको

28 जून

गिरणी कामगारांच्या 6 हजार 925 घरांसाठी आज म्हाडातर्फे लॉटरी सुरू आहे. पण या लॉटरीला गिरणी कामगारांच्या 9 पैकी 6 संघटनांनी विरोध करत ही लॉटरी आज उधळून लावण्याचा इशारा दिला होता. पण पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्यानं या कामगारांनी वांद्रे इथं एसव्ही रोडवर रास्ता रोको आंदोलन केलं. सर्व 1 लाख 48 हजार कामगारांना मोफत घरं मिळाली पाहिजे अशी मागणी या कामगारांनी यावेळी केली. अखेर गिरणी कामगारांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी चर्चेसाठी बोलावल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. दरम्यान, 19 गिरण्यांमधील जागांवर बांधण्यात आलेल्या 6 हजार 925 घरांसाठी म्हाडाची लॉटरी सकाळपासून सुरू आहे. पहिल्या सत्रात 3 हजार 438 घरांसाठी लॉटरी झाली. तर आता दुसर्‍या उर्वरित घरांसाठी लॉटरीला सुरूवात झाली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही लॉटरी चालणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2012 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close