S M L

प्रणव मुखर्जी आणि संगमांचा उमेदवारीचा अर्ज दाखल

28 जूनराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी प्रणब मुखर्जी आणि पी. ए. संगमा या दोघांनीही आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या निमित्ताने दोन्ही बाजूंनी शक्तीप्रदर्शनाचा जोरदार प्रयत्न झाला. प्रणब मुखर्जी यांचा उमेदवारी अर्ज भरताना एनडीएपेक्षा वेगळा सूर लावणारे जनता दल युनायटेड आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते हजर राहतील अशी अटकळ होती. पण, या दोन्ही पक्षाकडून पाठिंबा दिल्यानंतरही कोणी हजर राहीलं नाही. प्रणव मुखर्जी यांचं पारडं जड असलं तरी या निवडणुकीमुळेच गेले काही काळ राष्ट्रीय राजकारणात बाजूला फेकले गेलेले पी. ए. संगमा पुन्हा एकदा चर्चेत आलेत. ते उमेदवारी अर्ज भरत असताना एनडीए मध्ये गेल्या काही आठवड्यांपूर्वीच दाखल झालेले सुब्रम्हण्यम स्वामी एनडीएच्या संयोजकाची भूमिका बजावत होते. खरंतर, शरद यादव हे एनडीएचे संयोजक आहेत. पण, त्यांच्या पक्षाने म्हणजेच जनता दल युनायटेडने प्रणवदांना पाठिंबा दिला असल्यामुळे यादव संसदेकडे फिरकलेही नाहीत. प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा - जन्म : 11 डिसेंबर 1935 - इतिहास आणि राज्यशास्त्रात MA- 1973 : इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात उद्योग खात्याचे उपमंत्री म्हणून प्रवेश- 1982 ते 1984 या काळात अर्थमंत्री - इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधींशी झालेल्या मतभेदांतून काँग्रेस सोडली - स्वत:चा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष काढला- 1989 : मुखर्जी काँग्रेस पक्षात परतले - पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री- वाजपेयी सरकारच्या काळात काँग्रेसचे राज्यसभेतले उपनेते म्हणून काम- 2004 : संरक्षणमंत्री- 2006 : परराष्ट्रमंत्री - 2008 : अर्थमंत्री पी.ए. संगमा यांच्या कारकीर्दीचा आढावा- जन्म : 1 सप्टेंबर 1947- आंतरराष्ट्रीय व्यवहारविषयात MA- 1973 : मेघालय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष- 1977 : 6व्या लोकसभेत तुरा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय- 1988 : मेघालय राज्याचे मुख्यमंत्री- 1996 ते 1998 काळात लोकसभेचे सभापती - 1999 : सोनियांच्या परदेशीपणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून हकालपट्टी- शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना- 2004 : शरद पवार यूपीएत सामील झाल्यानं राष्ट्रवादीला रामराम- 2005 : ममता बॅनजीर्ंशी जुळवून घेत राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेसची स्थापना- 2006 : पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले- मुलगी अगाथा संगमा 2009 पासून केंद्रात ग्रामीण विकास राज्यमंत्री

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2012 10:13 AM IST

प्रणव मुखर्जी आणि संगमांचा उमेदवारीचा अर्ज दाखल

28 जून

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी प्रणब मुखर्जी आणि पी. ए. संगमा या दोघांनीही आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या निमित्ताने दोन्ही बाजूंनी शक्तीप्रदर्शनाचा जोरदार प्रयत्न झाला. प्रणब मुखर्जी यांचा उमेदवारी अर्ज भरताना एनडीएपेक्षा वेगळा सूर लावणारे जनता दल युनायटेड आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते हजर राहतील अशी अटकळ होती. पण, या दोन्ही पक्षाकडून पाठिंबा दिल्यानंतरही कोणी हजर राहीलं नाही. प्रणव मुखर्जी यांचं पारडं जड असलं तरी या निवडणुकीमुळेच गेले काही काळ राष्ट्रीय राजकारणात बाजूला फेकले गेलेले पी. ए. संगमा पुन्हा एकदा चर्चेत आलेत. ते उमेदवारी अर्ज भरत असताना एनडीए मध्ये गेल्या काही आठवड्यांपूर्वीच दाखल झालेले सुब्रम्हण्यम स्वामी एनडीएच्या संयोजकाची भूमिका बजावत होते. खरंतर, शरद यादव हे एनडीएचे संयोजक आहेत. पण, त्यांच्या पक्षाने म्हणजेच जनता दल युनायटेडने प्रणवदांना पाठिंबा दिला असल्यामुळे यादव संसदेकडे फिरकलेही नाहीत.

प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा

- जन्म : 11 डिसेंबर 1935 - इतिहास आणि राज्यशास्त्रात MA- 1973 : इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात उद्योग खात्याचे उपमंत्री म्हणून प्रवेश- 1982 ते 1984 या काळात अर्थमंत्री - इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधींशी झालेल्या मतभेदांतून काँग्रेस सोडली - स्वत:चा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष काढला- 1989 : मुखर्जी काँग्रेस पक्षात परतले - पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री- वाजपेयी सरकारच्या काळात काँग्रेसचे राज्यसभेतले उपनेते म्हणून काम- 2004 : संरक्षणमंत्री- 2006 : परराष्ट्रमंत्री - 2008 : अर्थमंत्री

पी.ए. संगमा यांच्या कारकीर्दीचा आढावा

- जन्म : 1 सप्टेंबर 1947- आंतरराष्ट्रीय व्यवहारविषयात MA- 1973 : मेघालय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष- 1977 : 6व्या लोकसभेत तुरा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय- 1988 : मेघालय राज्याचे मुख्यमंत्री- 1996 ते 1998 काळात लोकसभेचे सभापती - 1999 : सोनियांच्या परदेशीपणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून हकालपट्टी- शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना- 2004 : शरद पवार यूपीएत सामील झाल्यानं राष्ट्रवादीला रामराम- 2005 : ममता बॅनजीर्ंशी जुळवून घेत राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेसची स्थापना- 2006 : पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले- मुलगी अगाथा संगमा 2009 पासून केंद्रात ग्रामीण विकास राज्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2012 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close