S M L

पाकची पलटी, सरबजीत नव्हे तर सुरजीत सिंगची सुटका

27 जूनपाकिस्तान सरकार आता सरबजित सिंग नव्हे तर सुरजित सिंग यांना सोडणार आहे. पाकिस्तान सरकारनं काल रात्री उशिरा आपला निर्णय बदलत सरबजीत नव्हे तर सुरजीत सिंगची सुटका करणार असल्याचं सांगितलं. पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांच्या कार्यालयाकडून काल मंगळवारी संध्याकाळी सरबजित सिंग यांची सुटका होणार अशी घोषणा करण्यात आली होती. पण नंतरच्या 5 तासात पाकिस्तान सरकराकडून सरबजीत नाही तर सुरजित सिंग यांची सुटका होणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तान सरकारने आपला निर्णय अचानक का बदलला याची आता चर्चा सुरु झालीय. सुरवातीला सरबजीत यांच्या सुटकेची घोषणा करण्यात आल्यामुळे सरबजीतच्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला. पण अचनाक सुरुजीत यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे सरबजीतच्या कुटुंबाला धक्का बसला. पण सुरजीत यांच्या सुटकेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. सुरजीत गेल्या 30 वर्षांपासून पाकिस्तानच्या कैदेत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2012 11:30 AM IST

पाकची पलटी, सरबजीत नव्हे तर सुरजीत सिंगची सुटका

27 जून

पाकिस्तान सरकार आता सरबजित सिंग नव्हे तर सुरजित सिंग यांना सोडणार आहे. पाकिस्तान सरकारनं काल रात्री उशिरा आपला निर्णय बदलत सरबजीत नव्हे तर सुरजीत सिंगची सुटका करणार असल्याचं सांगितलं. पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांच्या कार्यालयाकडून काल मंगळवारी संध्याकाळी सरबजित सिंग यांची सुटका होणार अशी घोषणा करण्यात आली होती. पण नंतरच्या 5 तासात पाकिस्तान सरकराकडून सरबजीत नाही तर सुरजित सिंग यांची सुटका होणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तान सरकारने आपला निर्णय अचानक का बदलला याची आता चर्चा सुरु झालीय. सुरवातीला सरबजीत यांच्या सुटकेची घोषणा करण्यात आल्यामुळे सरबजीतच्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला. पण अचनाक सुरुजीत यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे सरबजीतच्या कुटुंबाला धक्का बसला. पण सुरजीत यांच्या सुटकेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. सुरजीत गेल्या 30 वर्षांपासून पाकिस्तानच्या कैदेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2012 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close