S M L

30 वर्षांनंतर ठेवले मायभूमीत पाऊल

28 जूनअखेर सुरजीत सिंग यांची 30 वर्षांनंतर पाकिस्तानच्या जेलमधून सुटका करण्यात आलीय. 30 वर्षानंतर सुरजीत आपल्या मायभूमीत पाऊल ठेवले. आज दुपारी त्यांचं भारतात आगमान झालंय. जेलमधून बाहेर आल्यानंतर सुरजीत यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यंानी भारत पाकिस्तानमधले संबंध सुधारावेत अशी इच्छा व्यक्त केलीय. तसेच पाकिस्तानने आपल्याला अटक केली तेव्हा आपलं वय 30 ते 35 वर्ष होतं आणि आता इतक्या वर्षानंतर आपण आपल्या कुटुंबाला भेटणार असल्यामुळे आपण भावूक झाल्याचं सुरजित यांनी म्हटलंय. सुरजीत यांचं भारतात आगमन झाल्यानंतर त्याचं कुटुंब सहपरीवार गोल्डन टेम्पलला भेट देणार आहेत आणि नंतर त्यांच्या घरी परतणार आहेत.सुरजीत यांच्या सुटकेनंतर त्यांच्या गावातही अगदी उत्साहाचं वातावरण आहे. त्यांच्या गावातल्या लोकांनी एकमेकांना लाडू वाटून आपला आनंद व्यक्त केला. सुरजीत यांच्या परीवाराने पाकिस्तान सरकारचे आभार देखील मानलेत. त्याच बरोबर सरबजीत यांची देखील लवकरता लवकर पाकिस्तानने सुटका करावी अशी मागणी त्यांनी पाकिस्तानकडे केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2012 10:45 AM IST

30 वर्षांनंतर ठेवले मायभूमीत पाऊल

28 जून

अखेर सुरजीत सिंग यांची 30 वर्षांनंतर पाकिस्तानच्या जेलमधून सुटका करण्यात आलीय. 30 वर्षानंतर सुरजीत आपल्या मायभूमीत पाऊल ठेवले. आज दुपारी त्यांचं भारतात आगमान झालंय. जेलमधून बाहेर आल्यानंतर सुरजीत यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यंानी भारत पाकिस्तानमधले संबंध सुधारावेत अशी इच्छा व्यक्त केलीय. तसेच पाकिस्तानने आपल्याला अटक केली तेव्हा आपलं वय 30 ते 35 वर्ष होतं आणि आता इतक्या वर्षानंतर आपण आपल्या कुटुंबाला भेटणार असल्यामुळे आपण भावूक झाल्याचं सुरजित यांनी म्हटलंय. सुरजीत यांचं भारतात आगमन झाल्यानंतर त्याचं कुटुंब सहपरीवार गोल्डन टेम्पलला भेट देणार आहेत आणि नंतर त्यांच्या घरी परतणार आहेत.सुरजीत यांच्या सुटकेनंतर त्यांच्या गावातही अगदी उत्साहाचं वातावरण आहे. त्यांच्या गावातल्या लोकांनी एकमेकांना लाडू वाटून आपला आनंद व्यक्त केला. सुरजीत यांच्या परीवाराने पाकिस्तान सरकारचे आभार देखील मानलेत. त्याच बरोबर सरबजीत यांची देखील लवकरता लवकर पाकिस्तानने सुटका करावी अशी मागणी त्यांनी पाकिस्तानकडे केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2012 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close