S M L

आणखी हल्ले करण्याचा होता अबूचा कट

28 जूनमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी अबू जुंदलची सध्या चौकशी सुरु आहे. आज चौकशी दरम्यान जुंदलने खळबळजणक खुलासा केला आहे. नागपूरमधल्या रेशमबाग भागातील संघाच्या मुख्यालयावर आणि दिल्लीतल्या अमेरिकन आणि इस्रायलच्या दूतावासांवर हल्ल्याचा कट होता अशी कबुली जुंदलने दिली. मुंबईवर जेंव्हा हल्ला झाला होता तेंव्हा पाकमध्ये वापरण्यात आलेली कंट्रोल रुम झकीऊर रहमान लख्वीच्या अटकेनंतर आयएसआयने नष्ट केली होती. कसाब आणि त्याच्या साथीदारांना कराचीतल्या कंट्रोलरूममधून मार्गदर्शन केलं जातं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार जुंदल हा 2005 सिमीमध्ये सहभागी झाला होता आणि लष्कर-ए-तोयबाचा सदस्य बनला होता. याचवर्षी स्फोटक हाताळण्याच्या ट्रेनिंगसाठी नेपाळला पाठवण्यात आलं होतं.नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी ट्रेनिंग घेतलं. आज जुंदल आणि फयाझ कागझी याच्याविरोधात एनआयएनं एफआयआर दाखल केलाय. एनआयए दिल्ली पोलिसांकडून लवकरच अबू जुंदलची कोठडी मागणार आहे. लष्कर-ए-तोयबामध्ये भर्ती होण्यासाठी कागझीनं आपल्याला मदत केल्याचं जुंदलनं चौकशीवेळी सांगितलं होतं. कागझी हा कॉलेजमध्ये जुंदलला सीनिअर होता. 2006 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग असल्याचं समजतं. दरम्यान, दिल्ली पोलीस सध्या अबूची चौकशी करत आहे. त्यांचा तपास झाला की अबूला एटीएस आणि क्राईम ब्रांचकडे हस्तांतरीत केलं जाईल आणि त्यानंतर त्याच्याकडून इतर माहिती समोर येईल असा विश्वास गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2012 12:00 PM IST

आणखी हल्ले करण्याचा होता अबूचा कट

28 जून

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी अबू जुंदलची सध्या चौकशी सुरु आहे. आज चौकशी दरम्यान जुंदलने खळबळजणक खुलासा केला आहे. नागपूरमधल्या रेशमबाग भागातील संघाच्या मुख्यालयावर आणि दिल्लीतल्या अमेरिकन आणि इस्रायलच्या दूतावासांवर हल्ल्याचा कट होता अशी कबुली जुंदलने दिली. मुंबईवर जेंव्हा हल्ला झाला होता तेंव्हा पाकमध्ये वापरण्यात आलेली कंट्रोल रुम झकीऊर रहमान लख्वीच्या अटकेनंतर आयएसआयने नष्ट केली होती. कसाब आणि त्याच्या साथीदारांना कराचीतल्या कंट्रोलरूममधून मार्गदर्शन केलं जातं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार जुंदल हा 2005 सिमीमध्ये सहभागी झाला होता आणि लष्कर-ए-तोयबाचा सदस्य बनला होता.

याचवर्षी स्फोटक हाताळण्याच्या ट्रेनिंगसाठी नेपाळला पाठवण्यात आलं होतं.नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी ट्रेनिंग घेतलं. आज जुंदल आणि फयाझ कागझी याच्याविरोधात एनआयएनं एफआयआर दाखल केलाय. एनआयए दिल्ली पोलिसांकडून लवकरच अबू जुंदलची कोठडी मागणार आहे. लष्कर-ए-तोयबामध्ये भर्ती होण्यासाठी कागझीनं आपल्याला मदत केल्याचं जुंदलनं चौकशीवेळी सांगितलं होतं. कागझी हा कॉलेजमध्ये जुंदलला सीनिअर होता. 2006 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग असल्याचं समजतं.

दरम्यान, दिल्ली पोलीस सध्या अबूची चौकशी करत आहे. त्यांचा तपास झाला की अबूला एटीएस आणि क्राईम ब्रांचकडे हस्तांतरीत केलं जाईल आणि त्यानंतर त्याच्याकडून इतर माहिती समोर येईल असा विश्वास गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2012 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close