S M L

मेहतर समाजाचे कामबंद आंदोलन मागे

29 जूनपंढरपुरात हातानं मैला साफ करणार्‍या मेहतर समाजानं आपलं कामबंद आंदोलन मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या समाजातील लोकांना घरांचं आश्वासन दिलंय. पण हातानं मैला साफ न करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी या समाजाला कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. ऐन आषाढीच्या तोंडावर हे कामबंद आंदोलन झाल्यानं पंढरपुरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे इथं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. वारकर्‍यांना त्रास नको म्हणून त्यांनी आंदोलन मागे घेतलंय. पण हातानं मैला साफ करणार नाही या मेहतर समाजाच्या मागणीवर कोणताही निर्णय झालेला नाही. मेहतर समाजही हाताने मैला साफ करणार नसल्याच्या निर्णायवर ठाम आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2012 01:50 PM IST

मेहतर समाजाचे कामबंद आंदोलन मागे

29 जून

पंढरपुरात हातानं मैला साफ करणार्‍या मेहतर समाजानं आपलं कामबंद आंदोलन मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या समाजातील लोकांना घरांचं आश्वासन दिलंय. पण हातानं मैला साफ न करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी या समाजाला कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. ऐन आषाढीच्या तोंडावर हे कामबंद आंदोलन झाल्यानं पंढरपुरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे इथं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. वारकर्‍यांना त्रास नको म्हणून त्यांनी आंदोलन मागे घेतलंय. पण हातानं मैला साफ करणार नाही या मेहतर समाजाच्या मागणीवर कोणताही निर्णय झालेला नाही. मेहतर समाजही हाताने मैला साफ करणार नसल्याच्या निर्णायवर ठाम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2012 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close