S M L

प्रणव मुखर्जी - पी.ए.संगमा आमनेसामने

28 जूनराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा या दोघांनीही आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या निमित्ताने दोन्ही बाजूंनी शक्तीप्रदर्शनाचा जोरदार प्रयत्न झाला. प्रणव मुखर्जी यांचं पारडं जड असलं तरी या निवडणुकीमुळेच, गेले काही काळ राष्ट्रीय राजकारणात बाजूला फेकले गेलेले पी. ए. संगमा पुन्हा एकदा चर्चेत आलेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला आता खर्‍या अर्थानं सुरुवात झालीय. प्रणव मुखर्जी यांनी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि यूपीएच्या घटक दलाच्या नेत्यांच्या उपस्थिती राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरताना तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी हजर नव्हत्या. पण प्रणव मुखजीर्ंच्या उमेदवारीला पाठिंबा देणार्‍या संयुक्त जनता दलाचा कुठलाही नेता अर्ज भरताना हजर नसल्याचं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. दुसरीकडे पी. ए. संगमा उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्याबरोबर मात्र मोजकेच नेते दिसले. संगमा यांना सर्वात आधी पाठिंबा देणारे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि भाजपचे काही नेते, यावेळी उपस्थित होते. यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्याकडे सध्यातरी बहुमत आहे. तृणमूल काँग्रेस वगळता यूपीएच्या सर्वच घटक पक्षांनी मुखजीर्ंना पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, संयुक्त जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक आणि एनडीएचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि संयुक्त जनता दलाचाही मुखजीर्ंना पाठिंबा आहे. त्यामुळे मुखजीर्ंकडे सध्या 62.3 टक्के मतं आहेत.दुसरीकडे संगमा यांच्या उमेदवारीला भाजप, शिरोमणी अकाली दल, झारखंड मुक्ती मोर्चा, बिजू जनता दल आणि अण्णाद्रमुकनं पाठिंबा दिलाय. त्यांच्याकडे 30.3 टक्के मतं आहेत.तर तृणमूल, तेलगू देसम पक्ष आणि इतर काही पक्षांनी आपले पत्ते अजून उघड केलेले नाही. पी. ए. संगमा यांच्याकडे बहुमत नाही. आपण निवडून आलो नाही, तरी प्रणवदांना आव्हान देणारा उमेदवार म्हणून इतिहासात आपल्या नावाची नोंद होईल, असं संगमांचं म्हणणंय. आता यापुढचे दोन आठवडे दोन्ही नेते प्रचाराचा धडाका लावतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2012 05:27 PM IST

प्रणव मुखर्जी - पी.ए.संगमा आमनेसामने

28 जून

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा या दोघांनीही आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या निमित्ताने दोन्ही बाजूंनी शक्तीप्रदर्शनाचा जोरदार प्रयत्न झाला. प्रणव मुखर्जी यांचं पारडं जड असलं तरी या निवडणुकीमुळेच, गेले काही काळ राष्ट्रीय राजकारणात बाजूला फेकले गेलेले पी. ए. संगमा पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला आता खर्‍या अर्थानं सुरुवात झालीय. प्रणव मुखर्जी यांनी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि यूपीएच्या घटक दलाच्या नेत्यांच्या उपस्थिती राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरताना तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी हजर नव्हत्या. पण प्रणव मुखजीर्ंच्या उमेदवारीला पाठिंबा देणार्‍या संयुक्त जनता दलाचा कुठलाही नेता अर्ज भरताना हजर नसल्याचं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

दुसरीकडे पी. ए. संगमा उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्याबरोबर मात्र मोजकेच नेते दिसले. संगमा यांना सर्वात आधी पाठिंबा देणारे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि भाजपचे काही नेते, यावेळी उपस्थित होते.

यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्याकडे सध्यातरी बहुमत आहे. तृणमूल काँग्रेस वगळता यूपीएच्या सर्वच घटक पक्षांनी मुखजीर्ंना पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, संयुक्त जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक आणि एनडीएचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि संयुक्त जनता दलाचाही मुखजीर्ंना पाठिंबा आहे. त्यामुळे मुखजीर्ंकडे सध्या 62.3 टक्के मतं आहेत.

दुसरीकडे संगमा यांच्या उमेदवारीला भाजप, शिरोमणी अकाली दल, झारखंड मुक्ती मोर्चा, बिजू जनता दल आणि अण्णाद्रमुकनं पाठिंबा दिलाय. त्यांच्याकडे 30.3 टक्के मतं आहेत.

तर तृणमूल, तेलगू देसम पक्ष आणि इतर काही पक्षांनी आपले पत्ते अजून उघड केलेले नाही. पी. ए. संगमा यांच्याकडे बहुमत नाही. आपण निवडून आलो नाही, तरी प्रणवदांना आव्हान देणारा उमेदवार म्हणून इतिहासात आपल्या नावाची नोंद होईल, असं संगमांचं म्हणणंय. आता यापुढचे दोन आठवडे दोन्ही नेते प्रचाराचा धडाका लावतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2012 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close