S M L

पंतप्रधानांकडे अर्थखाते येताच सेन्सेक्स वधारला

29 जूनपंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रालयाची जबाबदारी घेतल्यानंतर शेअर मार्केटमध्ये त्याचे चांगले पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. आज सेन्सेक्स तब्बल 400 अंशांनी वधारला. शेअर मार्केटच्या या उसळीला अर्थ मंत्रालयाचा होऊ घातलेला निर्णयही कारणीभूत ठरला आहे. करबुडवेगिरी करणार्‍यांसाठी GAAR म्हणजेच जनरल ऍण्टी टॅक्स ऍव्हॉयडन्स ही करपद्धत सुचवण्यात आली होती. ती पद्धत मागे घेण्याचा विचार अर्थमंत्रालय करतंय. विमा आणि पेंशन क्षेत्रात 49 टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचाही पंतप्रधानांचा विचार आहे. आर्थिक पातळीवर या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडत असतानाच, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी एक गंभीर इशारा दिलाय. पुढच्या तीन ते चार महिन्यांत आर्थिक सुधारणांचा वेग मंदावलेला असेल, असं त्यांनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2012 04:20 PM IST

पंतप्रधानांकडे अर्थखाते येताच सेन्सेक्स वधारला

29 जून

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रालयाची जबाबदारी घेतल्यानंतर शेअर मार्केटमध्ये त्याचे चांगले पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. आज सेन्सेक्स तब्बल 400 अंशांनी वधारला. शेअर मार्केटच्या या उसळीला अर्थ मंत्रालयाचा होऊ घातलेला निर्णयही कारणीभूत ठरला आहे. करबुडवेगिरी करणार्‍यांसाठी GAAR म्हणजेच जनरल ऍण्टी टॅक्स ऍव्हॉयडन्स ही करपद्धत सुचवण्यात आली होती. ती पद्धत मागे घेण्याचा विचार अर्थमंत्रालय करतंय. विमा आणि पेंशन क्षेत्रात 49 टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचाही पंतप्रधानांचा विचार आहे. आर्थिक पातळीवर या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडत असतानाच, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी एक गंभीर इशारा दिलाय. पुढच्या तीन ते चार महिन्यांत आर्थिक सुधारणांचा वेग मंदावलेला असेल, असं त्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2012 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close