S M L

मैला साफ करण्यास मेहतर समाजाचा नकार

29 जून पंढरपुरातील मेहतर समाजातील तरुणांनी मानवी विष्ठा हाताने साफ करण्यास आणि ती डोक्यावर वाहण्याचं काम करण्यास नकार दिला आहे. मानवी विष्ठा हाताने साफ करण्यास कायद्याने बंदी आहे तरी पंढरपुरात प्रशासन मेहतर समाजकडून हे काम दरवर्षी करुन घेतं. पंढरपुरात दरवर्षी 4 मोठ्या वार्‍या होतात या निमित्ताने सुमारे एक कोटी भाविकांची इथे वर्दळ असते. या लोकांनी केलेली अस्वच्छता मेहतर समाजातील जवळपास अडीचशे स्त्री-पुरुष स्वच्छ करण्याचं काम करत असतात. 1993 मध्ये राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे मानवी मैला हाताने स्वच्छ करणं आणि डोक्यावर वाहून नेणं कायद्यानं प्रतिबंधित केले आहे. या निर्णयाला 19 वर्षे होऊन अजूनही या लोकांना न्याय मिळालेला नाही. शौेचालयांची पुरेशी व्यवस्था नसल्याने उघड्यावरच या काळात अस्वच्छता पसरते. मानवी विष्ठा स्वच्छ करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून मेहतर समाजातील लोकांची मदत घेण्यात येते. पण यावेळी मेहतर समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन 123 वर्षापासून दरवर्षी चाललेल्या ह्या कामास नकार दिल्याने पंढरपूर नगरपरिषदेचे धाबे दणाणले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2012 10:18 AM IST

मैला साफ करण्यास मेहतर समाजाचा नकार

29 जून

पंढरपुरातील मेहतर समाजातील तरुणांनी मानवी विष्ठा हाताने साफ करण्यास आणि ती डोक्यावर वाहण्याचं काम करण्यास नकार दिला आहे. मानवी विष्ठा हाताने साफ करण्यास कायद्याने बंदी आहे तरी पंढरपुरात प्रशासन मेहतर समाजकडून हे काम दरवर्षी करुन घेतं. पंढरपुरात दरवर्षी 4 मोठ्या वार्‍या होतात या निमित्ताने सुमारे एक कोटी भाविकांची इथे वर्दळ असते. या लोकांनी केलेली अस्वच्छता मेहतर समाजातील जवळपास अडीचशे स्त्री-पुरुष स्वच्छ करण्याचं काम करत असतात.

1993 मध्ये राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे मानवी मैला हाताने स्वच्छ करणं आणि डोक्यावर वाहून नेणं कायद्यानं प्रतिबंधित केले आहे. या निर्णयाला 19 वर्षे होऊन अजूनही या लोकांना न्याय मिळालेला नाही. शौेचालयांची पुरेशी व्यवस्था नसल्याने उघड्यावरच या काळात अस्वच्छता पसरते. मानवी विष्ठा स्वच्छ करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून मेहतर समाजातील लोकांची मदत घेण्यात येते. पण यावेळी मेहतर समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन 123 वर्षापासून दरवर्षी चाललेल्या ह्या कामास नकार दिल्याने पंढरपूर नगरपरिषदेचे धाबे दणाणले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2012 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close