S M L

प्रणवदा 13 जुलैला घेणार बाळासाहेबांची भेट

02 जुलैराष्ट्रपतीपदाचे उमेदवार माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं पाठिंबा दिल्याबद्दल बाळासाहेबांना धन्यवाद देण्यासाठी मुखर्जी 13 जुलैला बाळासाहेबांना भेटण्याची शक्यता असल्याच वृत्त पीटीआयनं दिलंय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या भूमिकेविरोधात जाऊन शिवसेनेनं यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केला. आता शिवसेनेनं केलेल्या सहकार्यबद्दल आभार मानण्यासाठी प्रणव मुखर्जी स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे. 19 जून रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी योग्य उमेदवार असल्याचं सांगत त्यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केलं होतं. प्रणव मुखर्जी हे योग्य उमेदवार असून कोणीही मान्यात तलवार नसताना वीर असल्याचा आव आणू नये असा टोलाही शिवसेनाप्रमुखांनी भाजपला लगावला. तसंच कोणीही शिवसेनेवर फसवणुकीचा आरोपही करु नये असा अप्रत्यक्ष इशाराही शिवसेनाप्रमुखांनी दिला होता. याअगोदरच्या दिवशी प्रणव मुखर्जी यांनी बाळासाहेबांना फोन करुन पाठिंब्या देण्यासाठी विनंती केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2012 12:05 PM IST

प्रणवदा 13 जुलैला घेणार बाळासाहेबांची भेट

02 जुलै

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं पाठिंबा दिल्याबद्दल बाळासाहेबांना धन्यवाद देण्यासाठी मुखर्जी 13 जुलैला बाळासाहेबांना भेटण्याची शक्यता असल्याच वृत्त पीटीआयनं दिलंय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या भूमिकेविरोधात जाऊन शिवसेनेनं यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केला. आता शिवसेनेनं केलेल्या सहकार्यबद्दल आभार मानण्यासाठी प्रणव मुखर्जी स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे. 19 जून रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी योग्य उमेदवार असल्याचं सांगत त्यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केलं होतं. प्रणव मुखर्जी हे योग्य उमेदवार असून कोणीही मान्यात तलवार नसताना वीर असल्याचा आव आणू नये असा टोलाही शिवसेनाप्रमुखांनी भाजपला लगावला. तसंच कोणीही शिवसेनेवर फसवणुकीचा आरोपही करु नये असा अप्रत्यक्ष इशाराही शिवसेनाप्रमुखांनी दिला होता. याअगोदरच्या दिवशी प्रणव मुखर्जी यांनी बाळासाहेबांना फोन करुन पाठिंब्या देण्यासाठी विनंती केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2012 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close