S M L

कोकणात पावसाची जोरदार हजेरी

02 जुलैमान्सूनने कोकणात पाऊल ठेवल्यानंतर चांगलीच पाठ फिरवली होती मात्र आता परतलाय. काल रविवारपासून कोकणामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्याला पावसाने झोडपून काढलंय. वैभववाडीमधल्या नापणे आणि उंबरडे गावातल्या घरांमध्ये पाणी भरलंय तर सोनाळीमधल्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पाणी भरल्यामुळे शाळेच्या तिसर्‍या मजल्यावर जाऊन आश्रय घ्यावा लागला होता. तसेच रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे आणि परिसरातल्या अनेक छोट्या पुलांवर पाणी भरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय . गेल्या 24 तासांत सिंधुदुर्गमध्ये 130 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. तर रत्नागिरीमध्ये सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात 121 मिलिमीटर झाला आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर उद्यापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा पाणी भरण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2012 01:40 PM IST

कोकणात पावसाची जोरदार हजेरी

02 जुलै

मान्सूनने कोकणात पाऊल ठेवल्यानंतर चांगलीच पाठ फिरवली होती मात्र आता परतलाय. काल रविवारपासून कोकणामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्याला पावसाने झोडपून काढलंय. वैभववाडीमधल्या नापणे आणि उंबरडे गावातल्या घरांमध्ये पाणी भरलंय तर सोनाळीमधल्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पाणी भरल्यामुळे शाळेच्या तिसर्‍या मजल्यावर जाऊन आश्रय घ्यावा लागला होता. तसेच रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे आणि परिसरातल्या अनेक छोट्या पुलांवर पाणी भरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय . गेल्या 24 तासांत सिंधुदुर्गमध्ये 130 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. तर रत्नागिरीमध्ये सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात 121 मिलिमीटर झाला आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर उद्यापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा पाणी भरण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2012 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close