S M L

पवारांचा टेलिकॉम मंत्रिगटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

02 जुलैकेंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी टेलिकॉमविषयक मंत्रिगटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एक पत्र लिहून कळवलंय. पंतप्रधान राजीनामा स्वीकारणार आहेत, असंही पवारांनी सांगितलंय. 2 जी संदर्भात आपल्यावर झालेल्या आरोपांमुळेच मी हे पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं पवार म्हणाले. प्रणव मुखर्जी यांनी या मंत्रिगटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पवारांकडे त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हा मंत्रीगट 3 जीचे दर आणि 2 जी संदर्भात सुप्रीम कोर्टाने रद्द केलेली लिलावाची प्रक्रिया ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. पवारांनी राजीनामा दिल्याने मंत्रिगटाची होणारी आजची बैठक रद्द झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2012 04:31 PM IST

पवारांचा टेलिकॉम मंत्रिगटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

02 जुलै

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी टेलिकॉमविषयक मंत्रिगटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एक पत्र लिहून कळवलंय. पंतप्रधान राजीनामा स्वीकारणार आहेत, असंही पवारांनी सांगितलंय. 2 जी संदर्भात आपल्यावर झालेल्या आरोपांमुळेच मी हे पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं पवार म्हणाले. प्रणव मुखर्जी यांनी या मंत्रिगटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पवारांकडे त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हा मंत्रीगट 3 जीचे दर आणि 2 जी संदर्भात सुप्रीम कोर्टाने रद्द केलेली लिलावाची प्रक्रिया ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. पवारांनी राजीनामा दिल्याने मंत्रिगटाची होणारी आजची बैठक रद्द झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2012 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close