S M L

मुखर्जी लाभाचं पद भूषवत आहे - संगमा

02 जुलैराष्ट्रपतीपदाचे उमेदवार पी. ए. संगमा यांच्या टीमने प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारीलाच आव्हान दिलंय. मुखर्जी कोलकत्यातल्या इंडियन स्टॅटीस्टिकल इन्स्टिट्यूचे प्रमुख आहेत. हे लाभाचं पद आहे. त्यामुळे ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढू शकत नाही असा आरोप संगमांच्या सहकार्‍यांनी केला आहे. पण मुखर्जी यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आठवडाभरपूर्वीच संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता असं स्पष्टीकरण काँग्रेसनं दिलंय. दरम्यान, या आरोपानंतर मुखर्जी यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली. राज्यसभेच्या सरचिटणीसांसमोर उद्या या आरोपाची शहानिशा केली जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2012 04:42 PM IST

मुखर्जी लाभाचं पद भूषवत आहे - संगमा

02 जुलै

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार पी. ए. संगमा यांच्या टीमने प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारीलाच आव्हान दिलंय. मुखर्जी कोलकत्यातल्या इंडियन स्टॅटीस्टिकल इन्स्टिट्यूचे प्रमुख आहेत. हे लाभाचं पद आहे. त्यामुळे ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढू शकत नाही असा आरोप संगमांच्या सहकार्‍यांनी केला आहे. पण मुखर्जी यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आठवडाभरपूर्वीच संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता असं स्पष्टीकरण काँग्रेसनं दिलंय. दरम्यान, या आरोपानंतर मुखर्जी यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली. राज्यसभेच्या सरचिटणीसांसमोर उद्या या आरोपाची शहानिशा केली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2012 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close