S M L

प्रणवदांचा उमेदवारीचा अर्ज स्विकारला

03 जुलैयुपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांचा उमेदवारी अर्ज अखेर स्विकारण्यात आला आहे. राष्ट्रपतीपदाचे दुसरे उमेदवार पी.ए.संगमा यांनी मुखर्जी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. पण हे आक्षेप सध्या फेटाळण्यात आलेत. प्रणव मुखर्जी यांनी कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टीकल इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. हे लाभाचं पद आहे असा आरोप संगमांच्या गटानं केला होता. पण प्रणव मुखर्जी यांनी या पदाचा राजीनामा दिल्याचं आता सांगितलं जातंय. प्रणवदांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोपही आता भाजपने केला. पण प्रणव मुखर्जी यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं प्रणवदांनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2012 04:33 PM IST

प्रणवदांचा उमेदवारीचा अर्ज स्विकारला

03 जुलै

युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांचा उमेदवारी अर्ज अखेर स्विकारण्यात आला आहे. राष्ट्रपतीपदाचे दुसरे उमेदवार पी.ए.संगमा यांनी मुखर्जी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. पण हे आक्षेप सध्या फेटाळण्यात आलेत. प्रणव मुखर्जी यांनी कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टीकल इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. हे लाभाचं पद आहे असा आरोप संगमांच्या गटानं केला होता. पण प्रणव मुखर्जी यांनी या पदाचा राजीनामा दिल्याचं आता सांगितलं जातंय. प्रणवदांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोपही आता भाजपने केला. पण प्रणव मुखर्जी यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं प्रणवदांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2012 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close