S M L

ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे महिलेचा मृत्यू

03 जुलैविरारच्या ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. या हॉस्पिटलमध्ये उन्नती गुरव या महिलेची प्रसुती मेणबत्तीच्या उजेडात केल्यानं गर्भपिशवी बाहेर येऊन अति रक्तस्त्राव झाल्यानं त्या महिलेचा मृत्यू झालाय. या प्रकरणात विरार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. उन्नती गुरव या महिलेला प्रसुतीसाठी 22 जुनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याचदिवशी तिची प्रसुती झाली, पण लोडशेडींगमुळे वीज नव्हती आणि जनरेटरमध्ये रॉकेल नसल्याने मेणबत्तीच्या प्रकाशात प्रसुती करावी लागली आणि त्यामुळे उन्नतीची गर्भपिशवी बाहेर राहिल्यामुळे अति रक्तस्त्राव झाला आणि त्यातच तीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पतीनं केलाय. दरम्यान, ही रुग्णालयं महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचाआरोप आमदार विवेक पंडित यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2012 11:33 AM IST

ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे महिलेचा मृत्यू

03 जुलै

विरारच्या ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. या हॉस्पिटलमध्ये उन्नती गुरव या महिलेची प्रसुती मेणबत्तीच्या उजेडात केल्यानं गर्भपिशवी बाहेर येऊन अति रक्तस्त्राव झाल्यानं त्या महिलेचा मृत्यू झालाय. या प्रकरणात विरार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. उन्नती गुरव या महिलेला प्रसुतीसाठी 22 जुनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याचदिवशी तिची प्रसुती झाली, पण लोडशेडींगमुळे वीज नव्हती आणि जनरेटरमध्ये रॉकेल नसल्याने मेणबत्तीच्या प्रकाशात प्रसुती करावी लागली आणि त्यामुळे उन्नतीची गर्भपिशवी बाहेर राहिल्यामुळे अति रक्तस्त्राव झाला आणि त्यातच तीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पतीनं केलाय. दरम्यान, ही रुग्णालयं महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचाआरोप आमदार विवेक पंडित यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2012 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close