S M L

श्रीलंका दौर्‍यासाठी सचिनला विश्रांती ; सेहवाग इन

04 जुलैश्रीलंका दौर्‍यासाठी आज भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. येत्या 22 जुलैपासून भारतीय क्रिकेट टीम श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे.आणि इथंच ऑक्टोबरमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार असल्यानं टीममध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. कॅप्टनपदाची जबाबदारी महेंद्रसिंग धोणीकडेच ठेवण्यात आली आहे. तर वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खाननं टीममध्ये पुनरागमन केलंय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मात्र या दौर्‍यासाठी विश्रांती देण्यात आली आहेत. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या अजिंक्य रहाणे आणि अशोक दिंडाला टीममध्ये संधी मिळाली आहे. श्रीलंका दौर्‍यात भारतीय टीम 5 वन डे आणि 1 टी-20 मॅच खेळणार आहे. यातली पहिली वन डे 21 जुलैला, दुसरी वन डे 24 जुलैला, तिसरी वन डे 28 जुलैला, चौथी वन डे 31 जुलैला तर पाचवी वन डे 4 ऑगस्टला खेळवण्यात येईल. तर एकमेव टी 20 मॅच ही 7 ऑगस्टला खेळवली जाईल.अशी असेल भारतीय टीममहेंद्रसिंग धोणी, विराट कोहली, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, रोहित शर्मा, आर अश्विन, प्रग्यान ओझा, झहीर खान, उमेश यादव, अशोक दिंडा, विनय कुमार, अजिंक्य रहाणे, मनोज तिवारी आणि राहुल शर्मा..

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2012 09:40 AM IST

श्रीलंका दौर्‍यासाठी सचिनला विश्रांती ; सेहवाग इन

04 जुलै

श्रीलंका दौर्‍यासाठी आज भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. येत्या 22 जुलैपासून भारतीय क्रिकेट टीम श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे.आणि इथंच ऑक्टोबरमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार असल्यानं टीममध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. कॅप्टनपदाची जबाबदारी महेंद्रसिंग धोणीकडेच ठेवण्यात आली आहे. तर वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खाननं टीममध्ये पुनरागमन केलंय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मात्र या दौर्‍यासाठी विश्रांती देण्यात आली आहेत.

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या अजिंक्य रहाणे आणि अशोक दिंडाला टीममध्ये संधी मिळाली आहे. श्रीलंका दौर्‍यात भारतीय टीम 5 वन डे आणि 1 टी-20 मॅच खेळणार आहे. यातली पहिली वन डे 21 जुलैला, दुसरी वन डे 24 जुलैला, तिसरी वन डे 28 जुलैला, चौथी वन डे 31 जुलैला तर पाचवी वन डे 4 ऑगस्टला खेळवण्यात येईल. तर एकमेव टी 20 मॅच ही 7 ऑगस्टला खेळवली जाईल.

अशी असेल भारतीय टीम

महेंद्रसिंग धोणी, विराट कोहली, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, रोहित शर्मा, आर अश्विन, प्रग्यान ओझा, झहीर खान, उमेश यादव, अशोक दिंडा, विनय कुमार, अजिंक्य रहाणे, मनोज तिवारी आणि राहुल शर्मा..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2012 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close