S M L

कळणे मायनिंगवर कारवाई करण्यास टाळाटाळ

04 जुलैसहा महिने झाले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कळणे मायनिंगवर बेकायदा खनिज उत्खनन केल्याप्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्याचं दिसून येतंय. कोल्हापूर खनिकर्म विभागाने पहिल्यांदा डिसेंबर 2011 मध्ये केलेल्या तपासणीत कळणे मायनिंगमधून मोठ्या प्रमाणात बेकायदा लोहखनिज काढलं गेल्याचं पुढे आलं होतं. मात्र या अहवालावर कोणतीही कारवाई होत नसल्याचं लक्षात येताच आयबीएन लोकमतने आवाज उठवून हा अहवाल जनतेसमोर आणला होता. त्यानंतर खुद्द खाण राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही 15 दिवसात योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही दिलं होतं. त्याला दीड महिना होत आला तरी कळणे मायनिंगवर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनावर खाणमालकांना पाठीशी घालणार्‍या राजकीय नेत्यांचा दबाव असल्याचं कळणेचे ग्रामस्थ म्हणातायत. दरम्यान, नागपूर आणि कोल्हापूर खनिकर्म विभागाने 4 ते 7 मे रोजी केलेल्या पुर्नतपासणीतही या मायनिंगमधून बेकायदा लोहखनिज काढलं गेल्याचं निष्पन्न झालंय. हा अहवालही शासनाला तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍याना सादर केला गेलाय मात्र तरीही याबाबत सिंधुदुर्ग प्रशासनानेही कोणतीही कारवाई केलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2012 09:50 AM IST

कळणे मायनिंगवर कारवाई करण्यास टाळाटाळ

04 जुलै

सहा महिने झाले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कळणे मायनिंगवर बेकायदा खनिज उत्खनन केल्याप्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्याचं दिसून येतंय. कोल्हापूर खनिकर्म विभागाने पहिल्यांदा डिसेंबर 2011 मध्ये केलेल्या तपासणीत कळणे मायनिंगमधून मोठ्या प्रमाणात बेकायदा लोहखनिज काढलं गेल्याचं पुढे आलं होतं. मात्र या अहवालावर कोणतीही कारवाई होत नसल्याचं लक्षात येताच आयबीएन लोकमतने आवाज उठवून हा अहवाल जनतेसमोर आणला होता.

त्यानंतर खुद्द खाण राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही 15 दिवसात योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही दिलं होतं. त्याला दीड महिना होत आला तरी कळणे मायनिंगवर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनावर खाणमालकांना पाठीशी घालणार्‍या राजकीय नेत्यांचा दबाव असल्याचं कळणेचे ग्रामस्थ म्हणातायत.

दरम्यान, नागपूर आणि कोल्हापूर खनिकर्म विभागाने 4 ते 7 मे रोजी केलेल्या पुर्नतपासणीतही या मायनिंगमधून बेकायदा लोहखनिज काढलं गेल्याचं निष्पन्न झालंय. हा अहवालही शासनाला तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍याना सादर केला गेलाय मात्र तरीही याबाबत सिंधुदुर्ग प्रशासनानेही कोणतीही कारवाई केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2012 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close