S M L

कोकणात पावसाचे धुमशान

03 जुलैगेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसानं कोकणात आता जोर पकडलाय. आज झालेल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्याला पावसाचा जोरदार फटका बसलाय. तालुक्यातल्या नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सुशेरी इथल्या बौद्धवाडीसह 150 घरांचाही संपर्क तुटलाय. तसेच शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलीय. त्याचबरोबर वीटभट्‌ट्यांचंही मोठं नुकसान झालंय. सुशेरी गावातल्या रस्त्यांवर पाच फूट पाणी भरल्याने याच वाडीत नेल्या जाणार्‍या एका मृतदेहालाही तीन तास वाटेतच रखडावं लागलं.अखेर छातीभर पाण्यातूनच गावकर्‍यांनी हा मृतदेह नदी पलीकडे नेला. तब्बल 15 ते 20 वीटभट्‌ट्यांचंही मोठं नुकसान झालंय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दुकानवाड आणि आंजिवडे या गावांचाही पावसामुळे पुलांवर आलेल्या पाण्यानं संपर्क तुटलाय. मुंबई गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वे मात्र सुरळीत असल्याचं कळतंय. मात्र गेल्या 24 तासांत रायगड जिल्ह्यात सरासरी 68.57 मिलीमीटर पावसाची नोंद झाली . तळा, म्हसळा, माणगाव, पोलादपूर आणि मुरुड तालुक्यांना पावसाचा जोरदार फटका बसला. गेल्या 24 तासांत मुरुड तळा तब्बल 148 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर म्हसळा येथे 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याहून कमी माणगाव येथे 118 तर पोलादपूर येथे 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वादळी वार्‍यामुळे उरण तालुक्यातील गावात 30 ते 40 घरांचं नुकसान झालं. घरांचे पत्रे आणि कौलं उडून गेली आहेत. जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, आंबा गाढी आणि पाताळगंगा नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झालीय. जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. येत्या 48 तासांत कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2012 02:11 PM IST

कोकणात पावसाचे धुमशान

03 जुलै

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसानं कोकणात आता जोर पकडलाय. आज झालेल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्याला पावसाचा जोरदार फटका बसलाय. तालुक्यातल्या नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सुशेरी इथल्या बौद्धवाडीसह 150 घरांचाही संपर्क तुटलाय. तसेच शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलीय. त्याचबरोबर वीटभट्‌ट्यांचंही मोठं नुकसान झालंय. सुशेरी गावातल्या रस्त्यांवर पाच फूट पाणी भरल्याने याच वाडीत नेल्या जाणार्‍या एका मृतदेहालाही तीन तास वाटेतच रखडावं लागलं.अखेर छातीभर पाण्यातूनच गावकर्‍यांनी हा मृतदेह नदी पलीकडे नेला.

तब्बल 15 ते 20 वीटभट्‌ट्यांचंही मोठं नुकसान झालंय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दुकानवाड आणि आंजिवडे या गावांचाही पावसामुळे पुलांवर आलेल्या पाण्यानं संपर्क तुटलाय. मुंबई गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वे मात्र सुरळीत असल्याचं कळतंय. मात्र गेल्या 24 तासांत रायगड जिल्ह्यात सरासरी 68.57 मिलीमीटर पावसाची नोंद झाली . तळा, म्हसळा, माणगाव, पोलादपूर आणि मुरुड तालुक्यांना पावसाचा जोरदार फटका बसला. गेल्या 24 तासांत मुरुड तळा तब्बल 148 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर म्हसळा येथे 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याहून कमी माणगाव येथे 118 तर पोलादपूर येथे 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वादळी वार्‍यामुळे उरण तालुक्यातील गावात 30 ते 40 घरांचं नुकसान झालं.

घरांचे पत्रे आणि कौलं उडून गेली आहेत. जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, आंबा गाढी आणि पाताळगंगा नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झालीय. जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. येत्या 48 तासांत कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2012 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close