S M L

मुंबईला पावसाने झोडपले ; एकाचा मृत्यू

04 जुलैमुंबईतही पावसानं काल रात्रीपासून पुन्हा एकदा जोर धरला आहे. रात्रभर झालेल्या पावसानं कुर्ला, घाटकोपर , अंधेरीतील मिलन सबवे ,दादर हिंदू कॉलनी परिसरात काही ठिकाणी पाणी साचलंय. गेल्या 24 तासात मुंबई शहरात 73.8 मि.मि पाऊसाची नोंद झाली आहे. मालाडमध्ये गोपाळभवन ही 4 मजली इमारत कोसळली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय चंद्रकांत संघवी असं त्यांचं नाव आहे. या इमारतीला आधीच धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्यानं ही इमारत आधीच रिकामी करण्यात आली होती. पाऊस सुरू असला तरी लोकल वाहतूक सुरू आहे. पण मध्य रेल्वे मार्गावर लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहे. ठाणे स्टेशनवर एक नंबर ट्रॅकवर पाण्यामुळे खडी वाहून गेल्यानं पाच फुटाचा खड्डा पडला आहे. या खड्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. लोकल्स 15 ते 20 मिनीटे उशीरा धावत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2012 11:45 AM IST

04 जुलै

मुंबईतही पावसानं काल रात्रीपासून पुन्हा एकदा जोर धरला आहे. रात्रभर झालेल्या पावसानं कुर्ला, घाटकोपर , अंधेरीतील मिलन सबवे ,दादर हिंदू कॉलनी परिसरात काही ठिकाणी पाणी साचलंय. गेल्या 24 तासात मुंबई शहरात 73.8 मि.मि पाऊसाची नोंद झाली आहे. मालाडमध्ये गोपाळभवन ही 4 मजली इमारत कोसळली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय चंद्रकांत संघवी असं त्यांचं नाव आहे. या इमारतीला आधीच धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्यानं ही इमारत आधीच रिकामी करण्यात आली होती. पाऊस सुरू असला तरी लोकल वाहतूक सुरू आहे. पण मध्य रेल्वे मार्गावर लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहे. ठाणे स्टेशनवर एक नंबर ट्रॅकवर पाण्यामुळे खडी वाहून गेल्यानं पाच फुटाचा खड्डा पडला आहे. या खड्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. लोकल्स 15 ते 20 मिनीटे उशीरा धावत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2012 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close