S M L

कोयनेचा अहवाल 6 वर्ष धूळखात

04 जुलैपश्चिम घाट समितीच्या अहवालाची अंमलबजावणी तर झाली नाहीच पण कोयनेच्या अहवालाच्या वापराबद्दल दिलेला पेंडसे-कद्रेकर समितीचा अहवालही गेली 6 वर्ष धूळ खात पडलाय. कोयनेतल्या वीज निर्मितीनंतर सोडल्या जाणार्‍या पाण्याचा पुन्हा कसा वापर करता येईल याबद्दलचा हा अहवाल आहे. माजी पाटबंधारे सचिव मधुकर पेंडसे आणि कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्रीरंग कद्रेकर यांची ही समिती होती. कोयनेमधलं 67.5 टीएमसीपाणी कोकणाच्या सिंचनासाठी कसं वापरता येईल, अशी शिफारस या समितीनं केली होती. पण हे पाणी मुंबईला नेण्याचा घाट घातला जातोय. याला कोकणवासियांचा तीव्र विरोध आहे. पेंडसे-कद्रेकर समितीचा हा अहवाल सरकारनं जाहीरही केलेला नाही. पुण्यातल्या सजग नागरिक मंचचे निमंत्रक विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकारात पाठपुरावा केल्यानंतर आता हा अहवाल त्यांना मिळणार आहे. हा अहवाल सरकारने वेबसाईटवर टाकावा, लोकांची मतं जाणून घेऊन त्यावर चर्चा करावी आणि मग या शिफारसींवर निर्णय घ्यावा अशी विनंती पुण्यातल्या सजग नागरिक मंचने केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2012 12:08 PM IST

कोयनेचा अहवाल 6 वर्ष धूळखात

04 जुलै

पश्चिम घाट समितीच्या अहवालाची अंमलबजावणी तर झाली नाहीच पण कोयनेच्या अहवालाच्या वापराबद्दल दिलेला पेंडसे-कद्रेकर समितीचा अहवालही गेली 6 वर्ष धूळ खात पडलाय. कोयनेतल्या वीज निर्मितीनंतर सोडल्या जाणार्‍या पाण्याचा पुन्हा कसा वापर करता येईल याबद्दलचा हा अहवाल आहे. माजी पाटबंधारे सचिव मधुकर पेंडसे आणि कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्रीरंग कद्रेकर यांची ही समिती होती.

कोयनेमधलं 67.5 टीएमसीपाणी कोकणाच्या सिंचनासाठी कसं वापरता येईल, अशी शिफारस या समितीनं केली होती. पण हे पाणी मुंबईला नेण्याचा घाट घातला जातोय. याला कोकणवासियांचा तीव्र विरोध आहे. पेंडसे-कद्रेकर समितीचा हा अहवाल सरकारनं जाहीरही केलेला नाही. पुण्यातल्या सजग नागरिक मंचचे निमंत्रक विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकारात पाठपुरावा केल्यानंतर आता हा अहवाल त्यांना मिळणार आहे. हा अहवाल सरकारने वेबसाईटवर टाकावा, लोकांची मतं जाणून घेऊन त्यावर चर्चा करावी आणि मग या शिफारसींवर निर्णय घ्यावा अशी विनंती पुण्यातल्या सजग नागरिक मंचने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2012 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close