S M L

ऑलिम्पिकमध्ये 'ड्रॅगन'ची भरारी

03 जुलैताकद, चपळता आणि चांगल्या कामगिरीची आस हे आहे ऑलिंपिकचं ध्येय...आणि हे ध्येय प्रत्यक्षात उतरवलं ते 2008 साली चीननं.. संपूर्ण क्रीडा जगताचं लक्ष लागलेल्या या स्पर्धेत चीनने आयोजन आणि खेळातही आपलं वर्चस्व सिध्द केलं. आणि म्हणूनच आतापर्यंतच्या सर्व ऑलिम्पिकमध्ये बीजिंग ऑलिम्पिकनं आपली वेगळी ओळख निर्माण केली. बीजिंग ऑलिम्पिक जगातल्या सगळ्या क्रीडाफॅन्सच्या अपेक्षांवर खरं उतरलं. चीन केवळ चांगले यजमान म्हणून नाहीत तर क्रीडा जगतातही एक नवे जगज्जेते म्हणूनही पुढे आले. 1984 साली चीननं पहिलं ऑलिम्पिक मेडल पटकावलं. आणि यानंतर फक्त 20 वर्षात त्यांनी मेडल टॅलीत अव्वल क्रमांक पटकावत संपूर्ण जगाला खेळातली आपली ताकद दाखवून दिली..अनेक वर्ल्ड रेकॉर्ड, ऑलिम्पिक रेकॉर्ड, आणि खेळाडंूच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीनं बीजिंग ऑलिम्पिक गाजलं. विशेष म्हणजे या ऑलिम्पिकमध्ये यजमान चीन क्रीडा जगतातील एक महासत्ता म्हणून जगासमोर आली. खेळात तर चीननं आपलं वर्चस्व सिध्द केलंच, पण भव्य दिव्य आयोजनामुळेही बीजिंग ऑलिम्पिकने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. मॉर्डन टेक्नॉलॉजीच्या मदतीनं चीनच्या प्रगतीचं आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन अवघ्या जगाला झालंअतिरेकी हल्ल्याची भिती, तिबेटी समर्थकांचा धोका अशा सार्‍या संकटांवर मात करत चीननं लाल रंगाची ताकद अवघ्या जगाला दाखवून दिली. क्रीडा जगतात महासत्ता बनण्याचा चीनचा हा प्रवास तसा सोपा नव्हता, पण अथक मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हा प्रवास सहज पार केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2012 03:24 PM IST

ऑलिम्पिकमध्ये 'ड्रॅगन'ची भरारी

03 जुलै

ताकद, चपळता आणि चांगल्या कामगिरीची आस हे आहे ऑलिंपिकचं ध्येय...आणि हे ध्येय प्रत्यक्षात उतरवलं ते 2008 साली चीननं.. संपूर्ण क्रीडा जगताचं लक्ष लागलेल्या या स्पर्धेत चीनने आयोजन आणि खेळातही आपलं वर्चस्व सिध्द केलं. आणि म्हणूनच आतापर्यंतच्या सर्व ऑलिम्पिकमध्ये बीजिंग ऑलिम्पिकनं आपली वेगळी ओळख निर्माण केली.

बीजिंग ऑलिम्पिक जगातल्या सगळ्या क्रीडाफॅन्सच्या अपेक्षांवर खरं उतरलं. चीन केवळ चांगले यजमान म्हणून नाहीत तर क्रीडा जगतातही एक नवे जगज्जेते म्हणूनही पुढे आले. 1984 साली चीननं पहिलं ऑलिम्पिक मेडल पटकावलं. आणि यानंतर फक्त 20 वर्षात त्यांनी मेडल टॅलीत अव्वल क्रमांक पटकावत संपूर्ण जगाला खेळातली आपली ताकद दाखवून दिली..

अनेक वर्ल्ड रेकॉर्ड, ऑलिम्पिक रेकॉर्ड, आणि खेळाडंूच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीनं बीजिंग ऑलिम्पिक गाजलं. विशेष म्हणजे या ऑलिम्पिकमध्ये यजमान चीन क्रीडा जगतातील एक महासत्ता म्हणून जगासमोर आली.

खेळात तर चीननं आपलं वर्चस्व सिध्द केलंच, पण भव्य दिव्य आयोजनामुळेही बीजिंग ऑलिम्पिकने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. मॉर्डन टेक्नॉलॉजीच्या मदतीनं चीनच्या प्रगतीचं आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन अवघ्या जगाला झालं

अतिरेकी हल्ल्याची भिती, तिबेटी समर्थकांचा धोका अशा सार्‍या संकटांवर मात करत चीननं लाल रंगाची ताकद अवघ्या जगाला दाखवून दिली. क्रीडा जगतात महासत्ता बनण्याचा चीनचा हा प्रवास तसा सोपा नव्हता, पण अथक मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हा प्रवास सहज पार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2012 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close