S M L

'गॉड पार्टिकल'चा शोध लागला ?

04 जुलैविश्वनिर्मितीचं रहस्य काय ? खरंच देव आहे का ? या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी गेल्या 50 वर्षापासून विविध शास्त्रज्ञांनी सुरु केलेल्या मोहिमेला अखेर यश मिळालंय. जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा सर्न मध्ये शास्त्रज्ञांच्या टीमने 'गॉड पार्टिकल'च्या रहस्याची उकल करण्यासंदर्भात आज अतिशय महत्त्वाचा खुलासा केला आहे. 'सर्न' च्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयोगशाळेत ईश्वरीय अणु कण प्राप्त झाले आहे. या गॉड पार्टिकलशी साधर्म्य दाखवणारा मूलकण सापडल्याचा दावा शास्त्रज्ञ करताहेत. विश्वाच्या निर्मितीचं रहस्य उलगडणार्‍या हिग्ज बोसॉन म्हणजेच गॉड पार्टिकलचा शोध लागण्याच्या अतिशय जवळ पोचल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. स्वित्झलँडमधल्या जिन्हेवामध्ये असलेल्या सर्न प्रयोगशाळेत सध्या गॉड पार्टिकलचा शोध लावण्यासाठी प्रयोग होत आहेत. जिनेव्हातल्या सर्न प्रयोगशाळेत सुरू असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या आणि महागड्या प्रयोगानंतरचा.. जगभरातले शास्त्रज्ञ एक अतिसूक्ष्म असा मूलकण शोधत होते आणि या कणाची सर्वात आधी कल्पना मांडणारे होते पिटर हिग्ज..भौतिकशास्त्रज्ञ पिटर हिग्ज म्हणतात, माझ्या आयुष्यात हा कण सापडले, असं मला कधी वाटलंच नव्हतं.अणूमध्ये असणार्‍या इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा शोध अनेक दशकांपुर्वीच लागला. पण हिग्ज बोसॉन कण मात्र कुणालाही सापडले नव्हते. या हिग्ज बोसॉनमुळेच वस्तूला वस्तुमान म्हणजे वजन आणि आकार मिळतो, असं पिटर हिग्ज यांनी सिद्ध केलं. याच हिग्ज बोसॉनला गॉड्स पार्टिकलही म्हणतात. पण हा पार्टिकल अजून कुणाला सापडलेला नव्हता आणि म्हणूनच जगाच्या उत्पत्तीविषयी देण्यात येणारं स्पष्टीकरण योग्य आहे का, याबाबत शास्त्रज्ञ साशंक होते.सीएमएस एक्सपेरिमेंटचे मुख्य संशोधक प्रा. आर. के. शिवपुरी म्हणतात, हिग्ज बोसॉन कण नसते तर ग्रहच अस्तित्वात नसते, सोलार सिस्टिम नसती. तुम्ही आणि मीही नसतो.हिग्ज बोसॉन थेअरी मांडण्यात आली, त्याच्या पन्नास वर्षांनंतर, जगातला सर्वात मोठा प्रयोग करण्याचं स्वप्न बघितलं गेलं. त्याच्या 30 वर्षांनंतर आणि या प्रयोगाला प्रत्यक्ष सुरुवात झाली, त्याच्या 4 वर्षांनंतर हिग्ज बोसॉन कण म्हणजेच गॉड्स पार्टिकल शोधण्याच्या अतिशय जवळ पोचल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. पण ही तर फक्त सुरूवात आहे, असं शास्त्रज्ञ म्हणतात. आपण राहतो त्या ब्रह्मांडाची फक्त 4 टक्के माहिती आपल्याला आहे. 96 टक्के माहिती अजूनही गूढ आहे. या हिग्ज बोसॉन म्हणजेच गॉड्स पार्टिकलमुळे विश्वाच्या निर्मितीचं रहस्य उलगडेल आणि तिच्याबद्दल अधिकाधिक माहिती आपल्याला मिळेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे. गॉड्स पार्टिकलचा काय उपयोग आहे ?- वस्तूला आकार आणि वजन कसं प्राप्त होतं, याची उकल- ज्वालामुखीमध्ये इतकी ऊर्जा कुठून मिळते- तारे, ग्रह आणि जीवाच्या निर्मितीचं रहस्य उलगडेल- भौतिक विज्ञान योग्य दिशेनं काम करत असल्यावर शिक्कामोर्तब- इंटरनेटची गती वाढेल- तंत्रज्ञान क्रांतीला मदत- दळणवळण क्रांतीला मोलाची मदत- मोबाईलवरच सुपर कॉम्प्युटर मिळू शकेलभारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावरुन 'हिग्स बोसॉन' हिग्स बोसॉन हे नाव ब्रिटिश शास्त्रज्ञ पीटर हिग्स आणि भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्यावरून ठेवण्यात आलंय. कलकत्त्यातल्या बोस यांचं हे मूलकण शोधण्यात मूलभूत योगदान आहे. याशिवाय या प्रयोगातल्या 2000 पैकी 200 शास्त्रज्ञ भारतीय आहेत. हा प्रयोग ज्या 27 किलो मिटर लांब मशिनमध्ये सुरू आहे, त्याला आधार देणारे जॅक्स भारताने दिले आहेत. हे मशिन उभारण्यासाठीही सामग्री भारताने पुरवली. भारताने संगणकीय ग्रिडमध्येही मोठा वाटा उचललाय. सर्नला आतापर्यंत भारतानं 25 दखलक्ष रुपयांची मदतही केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2012 12:54 PM IST

'गॉड पार्टिकल'चा शोध लागला ?

04 जुलैविश्वनिर्मितीचं रहस्य काय ? खरंच देव आहे का ? या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी गेल्या 50 वर्षापासून विविध शास्त्रज्ञांनी सुरु केलेल्या मोहिमेला अखेर यश मिळालंय. जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा सर्न मध्ये शास्त्रज्ञांच्या टीमने 'गॉड पार्टिकल'च्या रहस्याची उकल करण्यासंदर्भात आज अतिशय महत्त्वाचा खुलासा केला आहे. 'सर्न' च्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयोगशाळेत ईश्वरीय अणु कण प्राप्त झाले आहे. या गॉड पार्टिकलशी साधर्म्य दाखवणारा मूलकण सापडल्याचा दावा शास्त्रज्ञ करताहेत.

विश्वाच्या निर्मितीचं रहस्य उलगडणार्‍या हिग्ज बोसॉन म्हणजेच गॉड पार्टिकलचा शोध लागण्याच्या अतिशय जवळ पोचल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. स्वित्झलँडमधल्या जिन्हेवामध्ये असलेल्या सर्न प्रयोगशाळेत सध्या गॉड पार्टिकलचा शोध लावण्यासाठी प्रयोग होत आहेत. जिनेव्हातल्या सर्न प्रयोगशाळेत सुरू असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या आणि महागड्या प्रयोगानंतरचा.. जगभरातले शास्त्रज्ञ एक अतिसूक्ष्म असा मूलकण शोधत होते आणि या कणाची सर्वात आधी कल्पना मांडणारे होते पिटर हिग्ज..

भौतिकशास्त्रज्ञ पिटर हिग्ज म्हणतात, माझ्या आयुष्यात हा कण सापडले, असं मला कधी वाटलंच नव्हतं.

अणूमध्ये असणार्‍या इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा शोध अनेक दशकांपुर्वीच लागला. पण हिग्ज बोसॉन कण मात्र कुणालाही सापडले नव्हते. या हिग्ज बोसॉनमुळेच वस्तूला वस्तुमान म्हणजे वजन आणि आकार मिळतो, असं पिटर हिग्ज यांनी सिद्ध केलं. याच हिग्ज बोसॉनला गॉड्स पार्टिकलही म्हणतात. पण हा पार्टिकल अजून कुणाला सापडलेला नव्हता आणि म्हणूनच जगाच्या उत्पत्तीविषयी देण्यात येणारं स्पष्टीकरण योग्य आहे का, याबाबत शास्त्रज्ञ साशंक होते.

सीएमएस एक्सपेरिमेंटचे मुख्य संशोधक प्रा. आर. के. शिवपुरी म्हणतात, हिग्ज बोसॉन कण नसते तर ग्रहच अस्तित्वात नसते, सोलार सिस्टिम नसती. तुम्ही आणि मीही नसतो.

हिग्ज बोसॉन थेअरी मांडण्यात आली, त्याच्या पन्नास वर्षांनंतर, जगातला सर्वात मोठा प्रयोग करण्याचं स्वप्न बघितलं गेलं. त्याच्या 30 वर्षांनंतर आणि या प्रयोगाला प्रत्यक्ष सुरुवात झाली, त्याच्या 4 वर्षांनंतर हिग्ज बोसॉन कण म्हणजेच गॉड्स पार्टिकल शोधण्याच्या अतिशय जवळ पोचल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. पण ही तर फक्त सुरूवात आहे, असं शास्त्रज्ञ म्हणतात. आपण राहतो त्या ब्रह्मांडाची फक्त 4 टक्के माहिती आपल्याला आहे. 96 टक्के माहिती अजूनही गूढ आहे. या हिग्ज बोसॉन म्हणजेच गॉड्स पार्टिकलमुळे विश्वाच्या निर्मितीचं रहस्य उलगडेल आणि तिच्याबद्दल अधिकाधिक माहिती आपल्याला मिळेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे.

गॉड्स पार्टिकलचा काय उपयोग आहे ?

- वस्तूला आकार आणि वजन कसं प्राप्त होतं, याची उकल- ज्वालामुखीमध्ये इतकी ऊर्जा कुठून मिळते- तारे, ग्रह आणि जीवाच्या निर्मितीचं रहस्य उलगडेल- भौतिक विज्ञान योग्य दिशेनं काम करत असल्यावर शिक्कामोर्तब- इंटरनेटची गती वाढेल- तंत्रज्ञान क्रांतीला मदत- दळणवळण क्रांतीला मोलाची मदत- मोबाईलवरच सुपर कॉम्प्युटर मिळू शकेल

भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावरुन 'हिग्स बोसॉन'

हिग्स बोसॉन हे नाव ब्रिटिश शास्त्रज्ञ पीटर हिग्स आणि भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्यावरून ठेवण्यात आलंय. कलकत्त्यातल्या बोस यांचं हे मूलकण शोधण्यात मूलभूत योगदान आहे. याशिवाय या प्रयोगातल्या 2000 पैकी 200 शास्त्रज्ञ भारतीय आहेत. हा प्रयोग ज्या 27 किलो मिटर लांब मशिनमध्ये सुरू आहे, त्याला आधार देणारे जॅक्स भारताने दिले आहेत. हे मशिन उभारण्यासाठीही सामग्री भारताने पुरवली. भारताने संगणकीय ग्रिडमध्येही मोठा वाटा उचललाय. सर्नला आतापर्यंत भारतानं 25 दखलक्ष रुपयांची मदतही केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2012 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close