S M L

इफ्फीच्या तिस-या दिवसावर बॉलिवुडचं वर्चस्व

26 नोव्हेंबर, पणजी मनिषा महालदारगोवा इथे सुरू असलेल्या 39 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या तिसर्‍या दिवसावरती वर्चस्व राहिलं ते बॉलिवुडचं. गुल पनाग, टिस्का चोप्रा, आशुतोष राणा या कलाकारांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. ऑस्करला दाखल झालेला ' तारे जमीं पर ' हा सिनेमा यावेळी दाखवण्यात आला. प्रेक्षकांनी हा सिनेमा एन्जॉय तर केलाच पण त्याबरोबर ऑस्करसाठी भरभरून शुभेच्छाही दिल्या. " मी आमीरची खूप मोठी फॅन आहे. त्याचा हा सिनेमा मस्त आहे. मला वाटतं नक्कीच तो ऑस्करपर्यंत मजल मारेल," अशी प्रतिक्रिया अभिनेत्री गुल पनागने दिली. "' तारे जमीं पर'प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचलाय. या फक्त सोशल नाही तर या सिनेमाला ह्युमन टच आहे. त्यामुळेच हा सिनेमा आता ऑस्करच्या शर्यतीत अधिकृतपणे दाखल झालाय, " असं ' तारे...' ची अभिनेत्री टिस्का चोप्रा म्हणाली. यंदा इफ्फीला अनेक बॉलिवुडचे चेहरे दिसतायत . त्यामुळे फेस्टिव्हल जास्त ग्लॅमरस झालाय. असं नेहमीच व्हावं अशी इफ्फीच्या अधिकार्‍यांची इच्छा आहे. बॉलिवुड स्टार्स आणि इफ्फी मध्ये असलेल्या सिनेमांबद्दल प्रेक्षकांची प्रतिक्रिया मात्र संमिश्र होती." इतर बॉलिवुड मसाला सिनेमांसारखा ' तारे...' में हा सिनेमा एन्जॉय केला नाही. मजा आली नाही. कारण हे सिनेमे आम्ही टीव्ही वर बघतोच," असं ' इफ्फी 'ला दरवर्षी येणा-या एका प्रेक्षकाचं म्हणणं आहे. " स्टार्सना पाहताना मजा आली. पुढच्या वर्षी शाहरूख, अमिताभ यांना पुढच्या वर्षी पाहायला आवडेल, " असं काही प्रेक्षक म्हणाले. जर प्रेक्षकांचं मत असेल तर या फेस्टिव्हमध्ये बॉलिवुड स्टार्समुळे थोडंतरी ग्लॅमर आलंय असं म्हणायला हरकत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2008 08:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2008 08:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close